टीम इंडियामध्ये ‘विनिंग कम्पोझिशन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 04:17 IST2016-03-08T11:17:23+5:302016-03-08T04:17:23+5:30
सध्याचा भारतीय संघ हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ख्याती मिळवितो आहे.

टीम इंडियामध्ये ‘विनिंग कम्पोझिशन’
संतुलित संघ हा विजयाचा मानकरी ठरतो असे क्रिकेटचे जाणकार म्हणतात. आशिया चषकात भारतीय संघाने सहा सामने खेळले या सहाही सामन्यात भारताला विजय मिळाला. गोलंदाज व फलदाजांचे संतुलन व सर्वोत्तम कामगिरी या स्पर्धेदरम्यान पहावयास मिळाली. सध्याचा भारतीय संघ हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ख्याती मिळवितो आहे.
आयसीसी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी असून हा संघ आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा समतोल संघ आहे का, असा प्रश्न ‘सीएनएक्स’ने क्रिके ट चाहत्यांना विचारला. उणीवा असल्या तरी हा सर्वोत्तम आहे असे मत चाहत्यांनी यावेळी नोंदविले. सध्याचा भारतीय क्रिकेट संघात ‘विनिंग कम्पोझिशन’ असल्याचे त्यांनी सांगितले.
फुटबॉल, हॉकी पासून ते क्रिकेटपर्यंत सर्वंच खेळाच्या बाबतीत समतोल संघ विजयाचा मानकरी असतो असे म्हटले जाते. क्रिकटच्या बाबतीत तर ही भावना हमखास बोलून दाखविली जाते. भारतीय उपखंडातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेटला मान्यता मिळाली आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांग्लादेश क्रिकेट संघाला कसोटी दर्जा मिळालाच आहे, मात्र या शिवाय नेपाळ व अफगानिस्तान या देशांत सुद्धा क्रिकेटची लोकप्रियता वाढत आहे.
भारत, श्रीलंका, पाकिस्तान या देशांनी वर्ल्डकप जिंकल्याने सर्वोत्त्कृष्ट खेळाडूचा समावेश असलेला समतोल संघ म्हणून त्यांनी ख्याती मिळविली आहे. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिके टमध्ये अनेक विक्रम केले आहेत. या खेळाडूंच्या कामगिरीमुळे अनेक आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाला विजेतेपदाला गवसणी घालता आली. याच संघभावनेतून भारत जगज्जेता ठरेल, असा विश्वास शहरातील क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे.