दिवसापेक्षा रात्र झटपट गरमी का वाढते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 05:15 IST2016-03-13T12:15:37+5:302016-03-13T05:15:37+5:30

गत काही दशकांपासून रात्रीच्या तापमानात दिवसाच्या तुलनेत अधिक गतीने वाढ होताना दिसून येतेय.

Why do the heat increase day by day? | दिवसापेक्षा रात्र झटपट गरमी का वाढते?

दिवसापेक्षा रात्र झटपट गरमी का वाढते?

काही दशकांपासून रात्रीच्या तापमानात दिवसाच्या तुलनेत अधिक गतीने वाढ होताना दिसून येतेय. मागच्या ५० वर्षातील तापमानाच्या नोंदीचे अध्ययन केले असता हे आता स्पष्ट झाले आहे.

परंतु, रात्री तापमानात होणारी वाढ दिवसापेक्षा अधिक का असते, याचे कारण शोधण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत होते. अखरे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.

नॉर्वेमधील नॅनसेन इन्वाइरन्मेन्टल अँड रिमोट सेन्सिग सेंटर येथील प्रमुख संशोधक रिचर्ड डेव्ही यांच्या टीमने केलेल्या संशोधनानुसार, रात्री वाढणारी गरमी आणि हवामानप्रणालीचा थेट संबंध असतो. रात्रीचे तापमानावर वातावरणीय बलाचा परिणाम होत असल्यामुळे रात्री गरमी झटपट वाढते.

गरमीची वाढ ही पृष्ठभागापासून थोड्याशा वर असणाऱ्या हवेच्य थरावर अवलंबुन असते. यालाच ‘सीमा थर’देखील म्हणतात. वातावरणाशी एकदम वेगळा असा हा हवेचा थर असतो. दिवसा काही किलोमीटर जाडीचा हा थर रात्री केवळ काही शेकडो मीटरचा होऊन जातो. त्यामुळे रात्रीचे तापमान लवकर वाढते.

Global Warming

कृत्रिमरीत्या वातावरणात उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायआॅक्साईडमुळे अंतराळात जाणाºया रेडिएशन्सचे प्रमाण घटते आणि त्यामुळेदेखील तापमानात वाढ होते.

Web Title: Why do the heat increase day by day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.