कॉर्पोरेट जगताने महान व्यक्तींकडून काय शिकावे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:55 IST2016-01-16T01:14:36+5:302016-02-06T09:55:39+5:30

सकारात्मक बदल हवे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीच्या आयआयटी कॉलेजमध्ये केलेल्या भाषणात इतिहासातील महान व्यक्तींकडून आजच्या कॉर्पोरेट कंपन्यांनी काय शिकावे हे सउदाहरण फार चांगल्या प्रकारे सांगितले. स्पर्धेमध्ये फक्त टिकून राहण्यासाठीच नाही, तर पुढे जाण्यासाठी कंपन्यांनी त्यांच्या ऑफिस कल्चरमध्ये काही सकारात्मक बदल केले पाहिजे  

What should the corporate world learn from great men? | कॉर्पोरेट जगताने महान व्यक्तींकडून काय शिकावे ?

कॉर्पोरेट जगताने महान व्यक्तींकडून काय शिकावे ?

१.
रिचर्ड फेनमन (भौतिक शास्त्रज्ञ) : अणू बॉम्ब तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा नोबेल पारितोषिक विजेता रिचर्ड फेनमनबद्दल बोलताना राजन म्हणाले, प्रिन्सटन विद्यापीठाच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ अँडव्हॅन्स्ड स्टडीज्'मध्ये नवीन कल्पनांना वाव मिळत नाही असे रिचर्डला मनोमन वाटायचे. कारण तो जेव्हा तिथे होता तेव्हा त्याला प्रश्न विचारण्यासाठी एकही विद्यार्थी नव्हता. याचाच अर्थ की, कॉर्पोरेट जगतामध्ये वादविवाद, डिबेट, संभाषण व्हायलाच हवे. कारण प्रश्न विचारले तरच नवीन कल्पनांना पंख फुटतील.
२. शहंशाह अकबर (मुघल सम्राट) : अकबराच्या दरबारात नवरत्न म्हणजेच नऊ वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक होते. या नवरत्नांचे काम राजाला योग्य सल्ला देणे होते. याचाच अर्थ विविध दृष्टिकोनातून गोष्टींचा सखोल विचार केला तर सर्व प्रॉब्लेम्सचे निर्णायक सोल्युशन मिळते.
३. अल्बर्ट आईन्स्टाईन (महान संशोधक)
आईन्स्टाईनचा सर्वात मोठा शोध म्हणजे सापेक्षतेचा सिद्धांत. आजही फार थोड्याच लोकांना तो पूर्णपणे समजतो. विशेष म्हणजे, जग बदलणारा हा सिद्धांत त्याला एका साध्या कल्पनेवरून सुचला.
 

Web Title: What should the corporate world learn from great men?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.