अतिदक्षता विभागात लग्नसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 08:26 IST2016-03-10T15:20:27+5:302016-03-10T08:26:07+5:30
वडिलांची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने ठरविलेल्या तारखेच्या आधीच आयसीयूमध्ये वडिलांच्या समोर लग्न केले.

अतिदक्षता विभागात लग्नसोहळा
मिळालेल्या माहितीनुसार जुबल कर्बी फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना जवळपास 20 दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आतापर्यंत त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधार झालेला नाही. मागील सोमवारी जुबल यांनी त्यांची मित्र कॉलीन यांच्याशी लग्न केले.
दोघे मागील २६ वषार्पासून एकत्र रहात होते. जुबल कर्बी यांची मुलगी काइला कबीर्चे लग्न सात महिन्यांनंतर होती. परंतु वडिलांची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने ठरविलेल्या तारखेच्या आधीच आयसीयूमध्ये वडिलांच्या समोर लग्न केले.