अनन्या पांडेकडून घ्या खास टिप्स; ब्लॅकमध्येही दिसा क्लासी आणि सेक्सी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 15:34 IST2019-07-31T15:33:14+5:302019-07-31T15:34:02+5:30
सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स पदार्पणाच्या तयारीत आहेत. जान्हवी, सारा यांच्या डेब्यूनंतर आता चर्चा आहे ती, अनन्या पांडेची. अनन्याने करण जोहर निर्मीत 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.

अनन्या पांडेकडून घ्या खास टिप्स; ब्लॅकमध्येही दिसा क्लासी आणि सेक्सी
सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स पदार्पणाच्या तयारीत आहेत. जान्हवी, सारा यांच्या डेब्यूनंतर आता चर्चा आहे ती, अनन्या पांडेची. अनन्याने करण जोहर निर्मीत 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. डेब्युनंतरच्या पहिल्या चित्रपटातच अनन्याची फॅनफॉलोइंग वाढली आहे. एवढचं नाहीतर अनेक तरूणांच्या गळ्यातील ती ताईत बनली आहे.
अनन्या फक्त 19 वर्षांची आहे. परंतु फॅशन आणि स्टाइलबाबत असलेली तिची चॉइस अत्यंत क्लासी आहे.
सेक्सी आउटफिट्ससोबतच ट्रेडिशनल आउटफिट्स ती एकदम हटके स्टाइलमध्ये कॅरी करते. तिच्या याच अदांवर तरूणांसोबतच तरूणीही फिदा आहेत.
अनन्या आपल्या आउटफिट्समध्येही एक्सपरिमेंट करताना दिसून येते. सध्या चर्चा आहे अनन्याच्या ब्लॅक लूकची. गोल्ड, शिमर, पॉप कलर, पोल्का डॉट्स किंवा ग्राफिक प्रिंट्स...
या सर्वांसोबत एक्सपरिमेंट करायची असेल तर तुम्ही अनन्याकडून टिप्स घेऊ शकता. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर अनन्याचं इन्स्टाग्राम अकाउंट एकदा पाहाच...
एवढचं नाहीतर अनन्या आपल्या स्टाइल आणि फॅशन स्टेटमेंटने बॉलिवूडमध्ये आधीपासूनच आपली वेगळी जागा तयार करणाऱ्या अनेक स्टार किड्सना टक्कर देत आहे.
अनन्याचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यावर तुम्हाला कदाचित वाटेल की, तिचा फेवरेट कलर ब्लॅक आहे. कारण अनन्या ब्लॅक कलरचे वेगवेगळे आउटफिट्स कॉन्फिडंटली वेअर करताना दिसून येते.
तुम्हीही ब्लॅक आउटफिट्स वेअर करून हटके आणि क्लासी लूक करण्याच्या विचारात असाल तर अनन्याकडून टिप्स घेऊ शकता.
दरम्यान अनन्याने कार्तिक आर्यन सोबत 'पति पत्नी और वो' हा चित्रपटदेखील साईन केला आहे. काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे यांचा सिनेमा 'पति, पत्नी और वो'ची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. सध्या या सिनेमाची शूटिंग सुरु आहे. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून या गोष्टीची माहिती दिली. पति, पत्नी और वो 10 जानेवारी 2020 ला रिलीज होणार आहे.