​बाटलीसोडून बचतीचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 04:23 IST2016-03-08T11:23:50+5:302016-03-08T04:23:50+5:30

 तुम्ही जर आठवड्यातून ड्रिंकसाठी दोनदा बाहेर जात असाल तर तुमचे महिन्याकाठी ६५० डॉलर्स (सुमारे ३६ हजार रुपये) खर्च होतात. 

The way to save the bottles | ​बाटलीसोडून बचतीचा मार्ग

​बाटलीसोडून बचतीचा मार्ग

रूच्या व्यसनामुळे न केवळ आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात, तर खिशालाही मोठी झळ बसते. त्यामुळे दारूच्या आहारी गेलेल्या लोकांना दारू सोडण्यासाठी आरोग्याची भीती नाही तर खर्चाचा अंदाज करून देणे फायदेशीर ठरेल.

अमेरिकेत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून रंजक माहिती समोर आली आहे. टाईम मॅगझीननुसार, तुम्ही जर आठवड्यातून ड्रिंकसाठी दोनदा बाहेर जात असाल तर तुमचे महिन्याकाठी ६५० डॉलर्स (सुमारे ३६ हजार रुपये) खर्च होतात. म्हणजेच वर्षाला सात हजार डॉलर्स (४.५ लाख रुपये).

दोन रात्री बाहेर जाणे म्हणजे त्यात एकदा आॅफिस नंतर (दोन ड्रिंक, जेवण, टिपचा सामावेश) आणि दुसऱ्यांदा विकेंडला (अनेक ड्रिंक्स, कॉकटेल्स, स्नॅक्स, जेवणाचा सामावेश). म्हणजे आठवड्यातून सहा ते सात ड्रिंक्स होतात. या गटात अमेरिके तील सुमारे ३० टक्के लोकांचा सामावेश होतो.

आता दारूच्या नशेसाठी वर्षाला एवढा खर्च करणे खरचं योग्य आहे का याचा विचार झाला पाहिजे. दारू नियंत्रणात ठेवून तुम्ही किती बचत करू शकता!

drink money

Web Title: The way to save the bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.