या गावात झाला 28 वर्षांनंतर मुलाचा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 07:50 IST2016-03-10T14:50:18+5:302016-03-10T07:50:18+5:30

याच्या जन्मानंतर अख्ख्या ओसटाना शहरात जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. 

The village was born 28 years later | या गावात झाला 28 वर्षांनंतर मुलाचा जन्म

या गावात झाला 28 वर्षांनंतर मुलाचा जन्म

ong>आता मुल जन्माला येणे, यात नवीन काय? मात्र, ओसटानामधील या मुलाचा जन्म ही सर्वसाधारण घटना नाहीय. कारण इथे तब्बल 28 वर्षांनी म्हणजे 1987 सालानंतर पहिल्यांदाच मूल जन्माला आले आहे. पाब्लो असे या मुलाचं नाव आहे.

याच्या जन्मानंतर अख्ख्या ओसटाना शहरात जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. एखाद्या सण-उत्सवासारखा या मुलाचा जन्म साजरा केला जातो आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर करकोचा पक्षाची प्रतिकृती तयार करून लावण्यात आली आहे. ज्या पाईडमांटच्या डोंगररांगांमध्ये ओसटाना शहर वसले आहे.



या शहराचे महापौर गियाकॉमा लॉमबारडोही पाब्लोच्या जन्मानंतर प्रचंड आनंदी आहेत. गेल्या शतकभरापासून ओसटाना शहराची लोकसंख्या कमालीची घटत चालली आहे. पाब्लोच्या जन्मानंतर या शहराची लोकसंख्या 85 वर पोहोचली आहे. या लोकसंख्येतीलही अर्धीच लोकसंख्या कायमस्वरुपी ओसटानामध्ये राहते.

Web Title: The village was born 28 years later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.