भज्जी, रैनाच्या यादीत वरुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:25 IST2016-02-16T11:25:34+5:302016-02-16T04:25:34+5:30
भारतीय क्रिकेटपटू वरुण अॅरॉन याने आपली बालमैत्रीण रागिणी हिच्यासोबत जमशेदपूर न्यायालयात सोमवारी विवाह केला.

भज्जी, रैनाच्या यादीत वरुण
यावेळी त्यांचे कुटुंब व मित्र परिवार उपस्थित होते. येत्या गुरुवारी मोठ्या थाटामाटात ख्रिश्चन रितीरिवाजाप्रमाणे वरुण व रागिणी यांचा विवाह सोहळा चर्चमध्ये होणार आहे.
लग्नानिमित्त वरुणने मुंबई विरुद्ध रणजी सामन्यातून माघार घेतली आहे. सुरेश रैना, हरभजन सिंग आणि दिनेश कार्तिक यांच्यानंतर वरुणही विवाह बंधनात अडकला आहे.