ट्रॉय कोस्टाने गाजवली फॅशन नाईट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:21 IST2016-01-16T01:11:21+5:302016-02-05T06:21:18+5:30
मुंबईत सुरू असलेल्या व्हॅन हुसेन व जी क्यू फॅशन नाईटमध्ये गुरुवारी पहिल्या दिवशी वेशभूषाकार (डिझायनर) राघवेंद्र राठोडनं ब्रिटिश काळातील वेशभूषा करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

ट्रॉय कोस्टाने गाजवली फॅशन नाईट
मुंबईत व्हॅन हुसेन व जी क्यू फॅशन नाईटमध्ये पहिल्या दिवशी वेशभूषाकार (डिझायनर) राघवेंद्र राठोडनं ब्रिटिश काळातील वेशभूषा करून प्रेक्षकांची दाद मिळवली. त्यानंतर सुप्रसिद्ध वेशभूषाकार ट्रॉय कोस्टानं पॅरिस दौर्यादरम्यान त्याला स्फुरलेल्या वेशभूषा सादर केल्या. याला त्यानं 'बॉन्जुर मॉन्सियुर' असं नाव दिलं.
टिना देसाई आणि रणदीप हुडानं या वेशभूषा सादर केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आकाश अंबानींच्या वेशभूषा करून चर्चेत राहिलेल्या ट्रॉयनं या वेशभूषांविषयी सांगितलं, की जगप्रसिद्ध आयफेल टॉवर, आर्क द ट्रॉम्फी, लव्हलॉक ब्रिज या पॅरिसमधील सुप्रसिद्ध स्थळांची प्रेरणा या वेशभूषांच्या कलेक्शनमागे आहे.
'बॉन्जुर मॉन्सियुर' म्हणजेच 'गुड इव्हिनिंग जंटलमन'. पॅरिसमधील सभ्य गृहस्थ या वेशभूषा परिधान करतात. हे कलेक्शन प्रेमाचं प्रतीक आहे.