न्यूयॉर्क महोत्सवात त्रिलोक मलिकला पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:26 IST2016-01-16T01:16:13+5:302016-02-06T14:26:27+5:30
न्यूयॉर्कमध्ये झालेल्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मॅनहॅटन'मध्ये इंडियन-अमेरिकन चित्रपटनिर्माता त्...

न्यूयॉर्क महोत्सवात त्रिलोक मलिकला पुरस्कार
न यूयॉर्कमध्ये झालेल्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मॅनहॅटन'मध्ये इंडियन-अमेरिकन चित्रपटनिर्माता त्रिलोक मलिक यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. म्युझिक कल्चरल आर्ट्स, अभिनय आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटनिर्मिती या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना 'आऊटस्टँडिंग अँचिव्हमेंट अअँवॉर्ड' देण्यात आला. या महोत्सवात जगभरातील विविध क्षेत्रांतील चित्रपट दाखविण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले, ''या पुरस्काराने आणि या महोत्सवाने मी खूप आनंदित झालो आहे.''
मलिक यांच्या 'ऑन गोल्डन ईयर्स' चित्रपटासाठी त्यांना बेस्ट फिचर फिल्म यूएसए हा मानाचा पुरस्कारही या वेळी प्रदान करण्यात आला. हा चित्रपट सामाजिक विषयांवर भाष्य करतो.
मलिक यांच्या 'ऑन गोल्डन ईयर्स' चित्रपटासाठी त्यांना बेस्ट फिचर फिल्म यूएसए हा मानाचा पुरस्कारही या वेळी प्रदान करण्यात आला. हा चित्रपट सामाजिक विषयांवर भाष्य करतो.