TREND : आता ‘स्मार्ट इमेज’ सर्च करा फेसबुकवर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 18:06 IST2017-02-05T12:21:57+5:302017-02-05T18:06:54+5:30

फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी एक नविन फीचर सादर केले असून त्याद्वारे आता कुणीही अधिक उत्तम पध्दतीने प्रतिमा शोधू शकणार आहे.

TREND: Search for 'smart image' now on Facebook! | TREND : आता ‘स्मार्ट इमेज’ सर्च करा फेसबुकवर !

TREND : आता ‘स्मार्ट इमेज’ सर्च करा फेसबुकवर !

सबुकने आपल्या यूजर्ससाठी एक नविन फीचर सादर केले असून त्याद्वारे आता कुणीही अधिक उत्तम पध्दतीने प्रतिमा शोधू शकणार आहे. यात आर्टीफिशियल इंटिलेजियन्स आणि डीप न्यूरल नेटवर्कचा वापर करुन संबंधीत प्रतिमेतील पदार्थ, व्यक्ती, विख्यात स्थळे आदींबाबत फेसबुकला माहिती मिळणार आहे. अर्थात याच्याच आधाराने कुणीही अधिक अचूक पध्दतीने प्रतिमांचा शोधू घेऊ शकतील. याचा कंपनीला व्यावसायिक पातळीवरही लाभ होण्याची शक्यता आहे. सध्या फेसबुकवर कुणीही फक्त टॅग अथवा कॅप्शनच्या मदतीनेच प्रतिमा शोधू शकत होते. मात्र आता उत्तम रितीने इमेज सर्च करण्याची पध्दत विकसित करण्यात आली आहे.   

 

Web Title: TREND: Search for 'smart image' now on Facebook!