प्रवासाचा अनुभव केला पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:02 IST2016-01-16T01:14:06+5:302016-02-07T13:02:16+5:30

प्रवासाचा अनुभव केला पोस्ट बॉलिवूडचा महानायक 'बिग बी'ला पाहण्यासाठी दररोज त्यांच्या प्रतीक्षा या बंगल्यासमोर हजारो लोकांची गर्दी जमते. मात्र रविवारची सकाळ लोकलमधून प्रवास करणार्‍या मुंबईकरांसाठी आनंदाची ठरली. खुद्द अमिताभ बच्चन यांनी लोकलमधून प्रवास करून मुंबईकरांना लाख मोलाचा संदेश दिला.

Travel experience post | प्रवासाचा अनुभव केला पोस्ट

प्रवासाचा अनुभव केला पोस्ट

चित्रात माझ्या डाव्या बाजूला सौरभ बसला आहे. तो आमच्या एकेआरएचझेड या कार्यक्र मात दिसेल. सौरभ लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना गिटार वाजवतो व आपल्या सहप्रवाशांकडून पैसे गोळा करतो. हे पैसे तो कर्करुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी देतो. त्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. मी देखील त्याच्या या प्रवासात सामील होऊन मदत करणार आहे. त्याच्या या अद्भूत व साहसी विचाराला माझे पूर्ण सहकार्य आहे. बिग बींनी लोकलमध्ये दिला लाख मोलाचा संदेश
बॉलिवूडचा महानायक 'बिग बी'ला पाहण्यासाठी दररोज त्यांच्या प्रतीक्षा या बंगल्यासमोर हजारो लोकांची गर्दी जमते. मात्र रविवारची सकाळ लोकलमधून प्रवास करणार्‍या मुंबईकरांसाठी आनंदाची ठरली. खुद्द अमिताभ बच्चन यांनी लोकलमधून प्रवास करून मुंबईकरांना लाख मोलाचा संदेश दिला.
'बीग बीं'चा हा प्रवास सौरभ निंभकर या तेवीस वर्षांच्या तरुणासाठी होता.
सौरभ अंबरनाथ येथील एका औषधांच्या कंपनीत काम करतो. तो आपल्या कामाच्या वेळा सांभाळून अंबरनाथ ते दादर असा लोकल प्रवास करतो.
या प्रवासात सौरभ गिटारवर गाणी वाजवतो. दादरवरून पुन्हा डोंबिवलीपयर्ंत त्याचा हा परतीचा सुरेल प्रवास असतो. या गाण्यातून महिन्याकाठी सौरभकडे सहा ते सात हजार रुपये जमा होतात. हे पैसे तो ठाण्यातील कर्करोग पीडितांसाठी काम करणार्‍या एका सामाजिक संस्थेला तो दान करतो. कर्करोगामुळे सौरभच्या आईचे निधन झाले. तेव्हापासून कर्करोग पीडितांसाठी आपल्या गायनातून आर्थिक मदत उभी करण्याचा ध्यास सौरभने घेतला आहे. अमिताभ बच्चन होस्ट करीत असलेल्या 'आज की रात है जिंदगी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सौरभच्या प्रयत्नांना दाखविण्यात येईल. शिवाय सर्वांनी सौरभच्या या प्रयत्नात सामील व्हावे, असा संदेश देण्यासाठी स्वत: अमिताभ यांनी हा अनोखा प्रवास केला.

Web Title: Travel experience post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.