'2017मध्ये मिस वर्ल्ड'चा किताब पटकावणारी प्रसिद्ध मॉडेल मानुषी छिल्लर आपला ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलला नेहमी परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात असते. तुम्हाला विश्वास नसेल तर एकदा मानुषीच्या इन्स्टाग्राम अकाउंटला भेट द्या. तुम्हाला मानुषी बहुतेक फोटोंमध्ये ब्लॅक आउटफिट्समध्ये दिसून येईल. त्यावरून असं वाटतं की ब्लॅक हा मानुषीचा फेवरेट कलर असावा. अशातच तुम्हीही ब्लॅक लव्हर असाल तर मानुषीकडून ब्लॅक आउटफिट वेअर करण्यासाठी टिप्स घेऊ शकता.

जर तुम्हीही ब्लॅक लव्हर असाल तर तुम्हीही LBD म्हणजेच, लिटिल ब्लॅक ड्रेस नक्की घेऊ शकता. कारण या क्लासी ड्रेसशिवाय तुमचं वॉर्डरोब अपूर्णच आहे. गरज असेल तर तुम्ही मानुषीकडून  इन्स्पिरेशन घेऊ शकता. 

मिस वर्ल्ड 2018च्या क्राउनिंग सेरेमनीसाठी मानुषी आपल्या खास देसी लूकमध्ये दिसून आली. यावेळी मानुषी छिल्लरने प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केलेला ब्लॅक कलरचा सुंदर लेहेंगा वेअर केला होता. त्यासोबत ब्रालेट डिझाइनचा ब्लॅक ब्लाउज आणि लॉन्ग ट्रेल असलेला दुपट्टा मॅच केला होता. 

नॉर्मल लूकपेक्षा थोडासा वेगळा स्पोर्टी आणि हॉट लूक ट्राय करण्याच्या विचारात असाल तरीदेखील तुम्ही मानुषीकडून टिप्स घेऊ शकता. मानुषीचा ब्लॅक बाइकर गर्ल लूक तुम्ही ट्राय करू शकता. यामध्ये मानुषी ब्लॅक कलरच्या लेदर जॅकेट, ब्लॅक कलरची लेदर शॉर्ट स्कर्ट, ब्लॅक टॉप आणि ब्लॅक कलरच्या नी लेन्थ बुट्समध्ये दिसून आली होती. 

फक्त खास इव्हेंट्ससाठी नाही तर कॅज्युअल आउटिंगसाठीही मानुषी अनेकदा ब्लॅक कलर्सच्या आउटफिट्समध्ये दिसून येते. मग पाहिजे तर ब्लॅक कलरची tommy hilfigerचा वन पीस शॉर्ट ड्रेस असो, जो तिने ब्ल्यू कलरच्या स्पोर्ट्स शूज आणि रेड कॅपसोबत मॅच केलं होतं.

प्रसिद्ध डिझायनर अनीता डोंगरेने डिझाइन केलेली ब्लॅक कलरची नी लेन्थ फ्रॉक ड्रेस. दोन्ही लूकमध्ये मानुषी फार सुंदर दिसत होती.

मिस वर्ल्ड इव्हेंटदरम्यान, मानुषी छिल्लर सेक्सी थाई-हाई स्लिट वन शोल्डर गाउनमध्ये दिसून आली. मानुषीचा हा ड्रेस फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाइन केला होता. मानुषीचा हा लूक अनेक चाहत्यांना आवडला होता.


 
जेव्हा गोष्ट साडीची येते, त्यावेळीही मानुषी ब्लॅक कलरची निवड करताना दिसून येते. ब्लॅक कलरच्या फ्रिल पल्लू असलेल्या साडीला मानुषीने रेड कलरच्या कॉर्सेट ब्लाउजसोबत टीमअप करून वेअर केलं होतं. 

मानुषीचे इतर काही ब्लॅक आउटफिट्स :

Web Title: Tips from Miss World Manushi Chillar on how to wear black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.