बिहार निवडणुकीतून घेण्याचे तीन धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:01 IST2016-01-16T01:12:25+5:302016-02-07T14:01:48+5:30

तुमच्या टीममधील सर्व सदस्यांना त्यांचे मत मांडण्याची संधी देणे फार महत्त्वाचे असते. सर्वांच्या विचार...

Three lessons from Bihar elections | बिहार निवडणुकीतून घेण्याचे तीन धडे

बिहार निवडणुकीतून घेण्याचे तीन धडे

मच्या टीममधील सर्व सदस्यांना त्यांचे मत मांडण्याची संधी देणे फार महत्त्वाचे असते. सर्वांच्या विचारानेच निर्णय घेतला पाहिजे. आपल्या मताला किंमत आहे ही भावना जोमाने काम करण्याची प्रेरणा देते. मोकळेपणाने सर्वांना बोलाण्याची संधी आणि त्यांच्या मताचा आदर या गोष्टी त्यांची निष्ठा आणखी दृढ करतात.

1 मार्गदर्शक नेतृत्त्व
कोणत्याही टीममध्ये स्ट्राँग प्लेयर्स असणे महत्त्वाचे असते. परंतु त्यामुळे वाद होण्याचीसुद्धा शक्यता जास्त असते. त्यामुळे लीडरने सर्व टीम सदस्यांना मार्गदर्शित करून एका ध्येयासाठी काम करण्याचे प्रेरणा द्यावी. सर्वांना एकत्र बांधण्याची खरी कसब लीडर दाखवावी लागते. सर्वाचे अंदाज खोटे ठरवत बिहार निवडणुकीने भारतीय राजकारणामध्ये एका नवा अध्याय लिहिला. केवळ राजकारण्यांनीच नाही तर कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हज्नीसुद्धा बिहार निवडणुकीतून पुढील चार धडे घेतले पाहिजे.

2 सक्रिय व्हा
केवळ चर्चा, विचारमंथन करणे पुरेसे नाही. चर्चेतून झालेल्या निर्णयांवर काम करणे, सर्वांना सक्रिय सहभागी करून घेणे आणि स्वत:ही अँक्टिव्ह सहभागी होणे ही उत्तम लीडरची लक्षणे आहेत. जबाबदारी न मिळाल्यामुळे सदस्यांची निष्क्रियता आणखी बळावत जाते.

3 सबका साथ..
कोणताही प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेणे अनिवार्य असते. सध्या काय घडत आहे, त्यांचा रोल काय आहे, पुढे काय करणार आहोत, अशी अपडेटेड माहिती सदस्यांना वेळोवेळी दिली गेली पाहिजे. यामुळे त्यांची इव्हॉल्व्हमेंट वाढते. एकीचे बळ किती असते हे तर सर्वांनाच माहीत आहे.

 

Web Title: Three lessons from Bihar elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.