तांदळाच्या दाण्यावर लिहिले तब्बल तीस शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 04:04 IST2016-03-08T11:04:15+5:302016-03-08T04:04:15+5:30

 मायक्र पेंटर अंजलीने तांदळाच्या दाण्यावर तब्बल 30 शब्द लिहून नवा विश्वविक्रम केला आहे. 

Thirty words written on rice grains | तांदळाच्या दाण्यावर लिहिले तब्बल तीस शब्द

तांदळाच्या दाण्यावर लिहिले तब्बल तीस शब्द

ंदळाच्या दाण्यावरील कोर पाहणे अशक्य असेल तर त्यावर लिहणे किती कठीण काम असेल. मात्र नागपूरची मायक्रोपेंटर अंजली शाहूने ही किमया साध्य केली आहे. या मायक्र पेंटर अंजलीने तांदळाच्या दाण्यावर तब्बल 30 शब्द लिहून नवा विश्वविक्रम केला आहे.

अंजली ही व्यावसायिक चित्रकार असून यापूर्वी तिने तांदळाच्या दाण्यावर अनेक चित्रे साकारली आहे. यात गणेशांची विविध रूपे व देवीदेवतांची चित्रे रेखाटली आहे. आपल्या मायक्रोपेंटिंगचे प्रदर्शन देखील तिने भरविले आहे. आपल्या नावे विक्रम व्हावा यासाठी ती अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत होती. नुकतेच तिने तांदळाच्या दाण्यावर तीस शब्द लिहून नवा विश्वविक्रम केला आहे.



यापूर्वी तिने पन्नास तांदळाच्या दाण्यावर भारताचे संविधान पत्रिका लिहण्याचा विक्रम केला होता. तिच्या या प्रयत्नासाठी तिचे नाव रेकॉड बुक मध्ये सामील करण्यात आले आहे 

Web Title: Thirty words written on rice grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.