गायिका कॅरी कटोनाचा तीसरा घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:26 IST2016-01-16T01:13:51+5:302016-02-06T13:26:31+5:30
गायिका केरी कटोनाने तिसर्या नवर्याशीदेखील घटस्फोट घेतला आहे.

गायिका कॅरी कटोनाचा तीसरा घटस्फोट
वन डायरेक्शन
पॉप बॅँड 'वन डायरेक्शन'चे काम सांभाळणारा साइमन कॉवेल कामामुळे त्रस्त झाला असून, त्याला या कामापासून काही काळ सुट्टी घ्यावयाची आहे. साइमन म्हणतो की, बॅँडचे सर्व सदस्य गेल्या पाच वर्षांपासून प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यामुळे सगळेच सुट्टी घेण्याच्या विचारात आहेत. सुट्टीनंतर बॅँड पुन्हा सुरू होईल की नाही याबाबत शंका आहे. मात्र गेल्या पाच वर्षात आम्ही एकत्र केलेल्या कामाचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यामुळे सुट्टीनंतर बॅँड सुरू होईल किंवा नाही याची मी अजिबात तमा बाळगत नाही.
आई झाल्याचा आनंद
अभिनेत्री कैरी वॉशिंगटन म्हणते की, आई झाल्यामुळे माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. एप्रिल २0१४ मध्ये कैरीने मुलगी इसाबेल हिला जन्म दिला. इसाबेलच्या जन्मामुळे कैरीच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडत असल्याचे ती सांगते. इसाबेलला चांगले आयुष्य मिळावे यासाठी मी प्रयत्न करीत असून, तिला सर्व सुखसुविधा देण्यासाठी मी प्राधान्य देईल.