पुरुषांच्या फॅशनमध्ये 'इंडियन फॉर्मल'चा जलवा! लग्नापासून ऑफिस पार्टीपर्यंत 'असे' दिसा रुबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 16:54 IST2026-04-11T16:53:11+5:302026-04-11T16:54:10+5:30

स्मार्ट लूकसाठी स्मार्ट शॉपिंग महत्त्वाची, औपचारिक-अनौपचारिक समारंभात पुरुषांचे व्यक्तिमत्त्व खुलवणाऱ्या ट्रेंडी पेहरावाबद्दल जाणून घ्या. 

The 'Indian Formal' trend in men's fashion! From weddings to office parties, look 'like this'! | पुरुषांच्या फॅशनमध्ये 'इंडियन फॉर्मल'चा जलवा! लग्नापासून ऑफिस पार्टीपर्यंत 'असे' दिसा रुबाबदार!

पुरुषांच्या फॅशनमध्ये 'इंडियन फॉर्मल'चा जलवा! लग्नापासून ऑफिस पार्टीपर्यंत 'असे' दिसा रुबाबदार!

भारतीय पुरुषांसाठी सण, समारंभ किंवा लग्नाचे कार्य असो, 'एथनिक वेअर'ला (Ethnic Wear) नेहमीच प्राधान्य दिले जाते. मात्र, आता हा पेहराव केवळ लग्नापुरता मर्यादित न राहता 'फॉर्मल' (Formal) पद्धतीनेही मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे.  आजकाल केवळ कोट-पॅंट म्हणजे 'फॉर्मल' असे राहिलेले नाही. भारतीय पेहरावातील शिस्त आणि भव्यता यांचा मेळ घालून पुरुषांसाठी अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा धावता आढावा घेऊ. 

१. राजेशाही शेरवानी (Sherwani)

लग्नाच्या मुख्य समारंभासाठी शेरवानी हा पुरुषांचा सर्वात आवडता पेहराव आहे. सिल्क किंवा वेलवेट फॅब्रिकमधील शेरवानी आणि त्यावर बारीक भरतकाम (Embroidery) तुम्हाला एक रॉयल लुक देते. शेरवानीसोबत चुडीदार किंवा जोधपुरी पॅंटचा वापर सध्या ट्रेंडमध्ये आहे.

२. स्टायलिश नेहरू जॅकेट (Nehru Jacket)

जर तुम्हाला फार जड कपडे घालायचे नसतील, तर नेहरू जॅकेट हा सर्वोत्तम पर्याय आहे. साध्या कुर्त्यावर फ्लोरल किंवा सॉलिड रंगाचे नेहरू जॅकेट घातल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात भर पडते. हे जॅकेट ऑफिसमधील सांस्कृतिक कार्यक्रम किंवा छोट्या कौटुंबिक कार्यांसाठी उत्तम ठरते.

३. जोधपुरी किंवा बंदगळा सूट (Bandhgala Suit)

रॉयल आणि प्रोफेशनल लुक हवा असेल, तर बंदगळा सूटला पर्याय नाही. हा सूट पूर्णपणे बंद असतो आणि गळ्यावर त्याचे विशेष डिझाइन असते. कोणत्याही औपचारिक समारंभासाठी किंवा रिसेप्शन पार्टीसाठी हा पेहराव पुरुषांना एक वेगळीच उंची देतो.

४. इंडो-वेस्टर्न फ्युजन (Indo-Western)

ज्यांना पारंपारिक आणि पाश्चात्य अशा दोन्ही गोष्टींचा मिलाफ हवा आहे, त्यांच्यासाठी इंडो-वेस्टर्न पेहराव उत्तम आहे. लांब कुर्त्यावर अ‍ॅसिमेट्रिकल (Asymmetrical) जॅकेट किंवा स्टायलिश कोटाचा वापर करून तुम्ही मॉडर्न लुक मिळवू शकता.

५. कुर्त्याचे आधुनिक प्रकार (Modern Kurtas)

साधे पांढरे कुर्ते आता जुने झाले आहेत. आता चिकनकारी, लिनन आणि सिल्क कुर्ते विविध रंगात उपलब्ध आहेत. हे कुर्ते तुम्ही पायजमा, धोती किंवा अगदी डेनिमवर घालून सुद्धा 'सेमी-फॉर्मल' लुक मिळवू शकू शकता.

अ‍ॅक्सेसरीज आणि स्टायलिंग टिप्स (Styling Tips):

पादत्राणे: इंडियन फॉर्मल वेअरवर कोल्हापुरी चप्पल किंवा मोजडी (Jutti) सर्वात जास्त शोभून दिसते.

वॉच आणि पॉकेट स्क्वेअर: तुमच्या जॅकेट किंवा शेरवानीच्या रंगाला साजेसे पॉकेट स्क्वेअर आणि एक क्लासिक घड्याळ तुमच्या लुकला पूर्णत्व देते.

फॅब्रिकची निवड: उन्हाळ्यासाठी सुती (Cotton) किंवा लिनन आणि हिवाळ्यातील कार्यांसाठी सिल्क किंवा वेलवेटची निवड करा.

Web Title : पुरुषों के लिए भारतीय औपचारिक परिधान: हर अवसर के लिए स्टाइलिश विकल्प।

Web Summary : भारतीय औपचारिक परिधान शादियों से आगे बढ़ रहा है। शेरवानी, नेहरू जैकेट, बंदगला सूट, इंडो-वेस्टर्न फ्यूजन और आधुनिक कुर्ते स्टाइलिश विकल्प प्रदान करते हैं। कोल्हापुरी चप्पल या मोजरी, पॉकेट स्क्वायर और एक क्लासिक घड़ी के साथ एक्सेसराइज़ करके लुक को पूरा करें।

Web Title : Indian formal wear for men: Stylish options for every occasion.

Web Summary : Indian formal wear is trending beyond weddings. Sherwanis, Nehru jackets, Bandhgala suits, Indo-Western fusion, and modern kurtas offer stylish options. Accessorize with Kolhapuri chappals or Mojdis, pocket squares, and a classic watch for a complete look.