टी-२० विश्वचषकाचा हिरो जोगिंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 03:51 IST2016-03-11T10:51:03+5:302016-03-11T03:51:03+5:30
टी-२० विश्वचषकाचा हिरो जोगिंदर टी-२० विश्वचषक स्पर्धा आली आहे. आता तो जोगिंदर शर्मा कुठे आहे, असा प्रश्न साºयांनाच पडला असेल. हा विश्वचषक जिंकल्यानंतर जोगिंदरला हरियाणा पोलिसांमध्ये नोकरी मिळाली. २०१६ सालापर्यंत त्याला बढतीही मिळाली. सध्या तो पोलीस उपायुक्त म्हणून नोकरी करतो आहे.

टी-२० विश्वचषकाचा हिरो जोगिंदर
२००७ साली टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आपल्याला आठवतो का? भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक देशात ही अंतिम लढत होती. पाकिस्तानला शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात केवळ एक गडी शिल्लक होता. पाकिस्तानकडे लढवय्या फलंदाज मिसबाह-उल-हक होता. भारताकडून शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी जोगिंदर शर्माकडे होती. जोगिंदरने दोन चेंडू चांगले टाकल्यानंतर त्याने तिसरा चेंडू हा वाईड टाकला आणि त्यावर षटकार खेचला गेला. आता तीन चेंडूत सहा धावांची आवश्यकता होती. हा सामना पाकिस्तानकडे झुकला होता. मात्र जोगिंदरने मिसबाह उल हकला पुढच्या तीन चेंडूत फारशी मोठी कामगिरी करु दिली नाही आणि हा सामना भारताने जिंकला. जोगिंदर हिरो ठरला होता. भारताकडे विश्वचषक आला होता. त्यावेळी भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले.
आता ही गोष्ट सांगायचे कारण म्हणजे पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक स्पर्धा आली आहे. आता तो जोगिंदर शर्मा कुठे आहे, असा प्रश्न साºयांनाच पडला असेल. हा विश्वचषक जिंकल्यानंतर जोगिंदरला हरियाणा पोलिसांमध्ये नोकरी मिळाली. २०१६ सालापर्यंत त्याला बढतीही मिळाली. सध्या तो पोलीस उपायुक्त म्हणून नोकरी करतो आहे.