स्विफ्टची सर्वाधिक कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2016 11:36 PM2016-04-10T23:36:47+5:302016-04-10T16:36:47+5:30

गायिका टेलर स्विफ्ट २०१५ या वर्षातील सर्वात कमाई करणारी कलाकार बनली आहे. या रेसमध्ये तिने आॅस्कर विजेता अभिनेता लियोनाडरे डिकॅप्रियो आणि रॅपर जे जेड यांना मागे टाकले आहे. 

Swift's highest earnings | स्विफ्टची सर्वाधिक कमाई

स्विफ्टची सर्वाधिक कमाई

Next
यिका टेलर स्विफ्ट २०१५ या वर्षातील सर्वात कमाई करणारी कलाकार बनली आहे. या रेसमध्ये तिने आॅस्कर विजेता अभिनेता लियोनाडरे डिकॅप्रियो आणि रॅपर जे जेड यांना मागे टाकले आहे. स्विफ्ट (वय-२६) दरवर्षीच परेड साप्ताहिकाच्या ‘व्हाट पीपुल अर्न’च्या यादीत अग्रस्थानी राहिली आहे. तिने गेल्यावर्षी वर्ल्ड टूर आणि व्यापारी करारातून जवळपास आठ कोटी डॉलर रुपयांची कमाई केली. 
स्विफ्टने स्वत:चा मोबाइल गेम तयार केला असून, तो यावर्षीच्या अखेरपर्यंत लॉँच केला जाणार आहे. त्यामुळे याचाही तिला लाभ होण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध गायिका लेडी गागाने देखील गेल्या वर्षी चांगली कमाई केली. तिच्या खात्यात जवळपास ५.९ कोटी डॉलर जमा झाले. तर रॅपर जे जेडने विविध व्यापारी उपक्रमांमधून ५.६ कोटी डॉलरची कमाई केली. डिकॅप्रियोने जवळपास २.९ कोटी डॉलर कमाविले. 

Web Title: Swift's highest earnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.