सुरेश रैनाने केला होता सूसाईडचा विचार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 09:04 IST2016-03-11T16:04:35+5:302016-03-11T09:04:35+5:30
ओएमजी!!! होय, वाचता ते खरं वाचतायं. आज क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला धुरंधर फलंदाज सुरेश रैनाने किशोरावस्थेत आत्महत्येचा विचार केला होता.

सुरेश रैनाने केला होता सूसाईडचा विचार!!
ओ मजी!!! होय, वाचता ते खरं वाचतायं. आज क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला धुरंधर फलंदाज सुरेश रैनाने किशोरावस्थेत आत्महत्येचा विचार केला होता.अलीकडे एका मुलाखतीत रैनाने मनातील ही वेदना, त्यावेळची परिस्थिती, काही घटना अशा मनातील अनेक गोष्टी उघड केल्या. लखनौच्या स्पोर्ट्स हॉटेलमध्ये राहत असताना माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता. हॉस्टेलची दुसरे विद्यार्थी त्रास देत होतेच, त्याशिवायही यामागे दुसरी अनेक कारणे होती, असे रैनाने सांगितले.असाच एक किस्साही त्याने शेअर केला. त्याने सांगितले, १३ वर्षांचा असताना मी एकदा रेल्वेतून जात होतो. खाली पेपर टाकून झोपलो असतानाच रात्री अचानक छातीवर कुणीतरी भलेमोठे वजन ठेवले असल्याचे मला जाणवले. डोळे उघडून बघतो तर एक वजनदार मुलगा माझ्या छाताडावर बसला होता. केवळ बसलाच नाही तर काही क्षणात तो माझ्या तोंडावर सू सू करायला लागला. मी कसेबसे त्याच्या तावडीतून स्वत:ला सोडवले. तोपर्यंत रेल्वेची गती कमी झाली होती. मी त्याला एक ठोसा मारला आणि गाडीबाहेर फेकले. हॉस्टेलच्या दिवसात मला केवळ शिव्या नाही तर हॉकी स्टिकनेही बदडले गेले होते. माझा एक बॅचमेट यामुळे अक्षरश: कोमात गेला होता...