शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

आपल्या आयुष्यातील ‘सुपरमॅन’ आपला बाप - सिद्धार्थ जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2016 6:36 PM

आपण ज्यांच्यामुळे आहोत; त्या आई-वडिलांना कधीही विसरू नका. आयुष्यात असे काही तरी करून दाखवा, ज्यामुळे तुमच्या आई-वडिलांच्या चेहºयावर एक प्रकारचे समाधान असेल. हे जेव्हा घडेल; तेव्हा जगातील अशक्य गोष्टही तुमच्या पायाखाली येईल.

आपण ज्यांच्यामुळे आहोत; त्या आई-वडिलांना कधीही विसरू नका. आयुष्यात असे काही तरी करून दाखवा, ज्यामुळे तुमच्या आई-वडिलांच्या चेहºयावर एक प्रकारचे समाधान असेल. हे जेव्हा घडेल; तेव्हा जगातील अशक्य गोष्टही तुमच्या पायाखाली येईल. आपल्या इच्छा-आकांशा पूर्ण करण्यासाठी ते पदोपदी झटत असतात, याचे भान ठेवा. आपल्या आयुष्यातील खरा सुपरमॅन आपला बापच असतो, असे भावनिक आवाहन जळगावातील तरुणाईला मराठी सिनेअभिनेता सिद्धार्थ जाधव याने केले.मू.जे. महाविद्यालयाच्या वतीने ‘कार्निवल २०१६’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सायंकाळी ७ वाजता ए.टी. झांबरे विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तरुणाईशी संवाद साधतांना सिद्धार्थ जाधव बोलत होता. व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, केसीई सोसायटीचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, सामाजिक कार्यकर्ते नरेश खंडेलवाल, प्रा.अस्मिता पाटील, दिलीप चौबे, अ‍ॅड.संजय राणे, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, शीतल ओसवाल उपस्थित होते. प्रास्ताविक चंद्रकांत भंडारी यांनी केले. नटराज पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मनात न्यूनगंड बाळगू नकातरूण वयात आपण नेहमी दुसºयाचे अनुकरण करतो. त्यातून मनात न्यूनगंड निर्माण होतो. आयुष्यात स्वत:वर विश्वास ठेवा, प्रेम करा; स्वत:चे कौशल्य ओळखा, जग आपोआपच तुमच्यावर प्रेम करेल. हे सारे माझ्यासोबतही घडले आहे. मी हे केले; म्हणून अख्खा महाराष्टÑ माझ्यावर प्रेम करतो, असेही तो म्हणाला.‘बसणे’ म्हणजे आपले आयुष्य बसवण्यासारखेचसिद्धार्थ जाधव राज्याच्या व्यसनमुक्ती मोहिमेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असल्याने त्याने विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मनात न्यूनगंड आला की, आपण व्यसनांच्या आहारी जातो. चला, आज बसूया, असे म्हणून काही जण मद्यसेवन करतात. पण हे बसणे म्हणजे आपले आयुष्य बसवण्यासारखेच असते. ज्यावेळी एखाद्या पित्याचा मुलगा व्यसनाने मृत्यू पावतो. तेव्हा तो पिताही त्याच दिवशी मृत्यू पावलेला असतो. आई-वडील आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात. मात्र, ते कधीही व्यक्त होत नाहीत. व्यसनामुळे त्यांच्या आधी जगाचा निरोप घेण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही. तरीही जगाचा निरोपच घेत असाल तर असे काम करून जा, ज्यामुळे तुमच्या आई-वडिलांना तुमच्यावर गर्व होईल, असे आवाहन जाधवने केले.सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले.photo : Sumit Deshmukh