सुनील मुंजाल यांना मानद डी लिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 00:06 IST2016-02-19T07:06:25+5:302016-02-19T00:06:25+5:30

हीरो मोटार कॉर्पचे सह व्यवस्थापकीय संचालक सुनील मुंजाल यांना मानद डी लिट पदवी प्रदान करण्यात आली.

Sunil Munjal will be honored with Lt. | सुनील मुंजाल यांना मानद डी लिट

सुनील मुंजाल यांना मानद डी लिट

ong>एसआरएम विद्यापीठाच्या कट्टनकुलाथूर कॅम्पसमध्ये झालेल्या एका दिमाखदार सोहळ््यात जगातील सर्वाधिक मोटरसायकलची निर्मिती करणाºया हीरो मोटार कॉर्पचे सह व्यवस्थापकीय संचालक सुनील मुंजाल यांना मानद डी लिट पदवी प्रदान करण्यात आली.

शिक्षण, व्यवसाय आणि मानवी हितासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना मुंजाल म्हणाले, की आपल्या देशातील शैक्षणिक गुणवत्ता अधिक वाढण्याची गरज आहे. ते सर्वदूर पोहोचण्याचीही गरज आहे. लाखो भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी पुरेसा रोजगार निर्माण झाला पाहिजे.



आगामी १५ वर्षांत आपल्याला प्रत्येक महिन्याला सुमारे दहा लाख जणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल. अद्याप आपल्या देशातील सुमारे २५ कोटी जनतेला दोन वेळचे जेवण धडपणे मिळू शकत नाही. आपल्या अर्थव्यवस्थेचा ४१ टक्के भाग हा बाह्य घटकांवर अवलंबून आहे. आपल्याला स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करण्याची गरज आहे. 

भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा गतिमान करण्यासाठी सक्रिय योगदान देणाºया उद्योजकांमध्ये मुंजाल यांचा समावेश होतो. उद्योगाव्यतिरिक्त मुंजाल शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व देतात. बीएमएल एज्युकॉर्प सर्व्हिसेस या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाºया उपक्रमाव्यतिरिक्त बीएमएल मुंजाल विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.

त्यांच्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करताना एसआरएम विद्यापीठाच सन्मानित झाले असल्याचे गौरवोद्गार एसआरएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रबीर बागची यांनी यावेळी काढले. 

Web Title: Sunil Munjal will be honored with Lt.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.