स्टार किड्स इन सुपरकूल लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 10:23 IST2016-03-09T17:23:30+5:302016-03-09T10:23:30+5:30
अक्षयचा मुलगा आरव आणि सैफचा मुलगा इब्राहिम खान पतौडी या दोघांचा एक सुपरकूल फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरतो आहे.

स्टार किड्स इन सुपरकूल लूक!
स फ अली खान आणि अक्षय कुमार या दोघांचा ‘मैं खिलाडी तू अनाडी’ आठवतो? या दोघांनीही सिल्व्हर स्क्रीन दणाणून सोडली होती. आता दोघांप्रमाणेच त्यांच्या मुलांनीही आॅफस्क्रीन धमाका केला आहे. या दोघांचा एक सुपरकूल फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरतो आहे. अक्षयचा मुलगा आरव आणि सैफचा मुलगा इब्राहिम खान पतौडी(पहिली पत्नी अमृतापासून झालेला) यांचा हा फोटो आहे. क्यॅजुअल वेअरमध्ये असलेले आरव व इब्राहिम यांचा हॉट अॅण्ड हँडसम अवतार बघून ही बॉलिवूड एन्टीची तयारी तर नाही ना? असा सवाल तुम्हालाही पडल्या वाचून राहणार नाही.