श्रीशांत बनणार नेता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 19:49 IST2016-03-23T02:49:40+5:302016-03-22T19:49:40+5:30
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी तुरुंगवास भोगलेला क्रिकेटपटू एस. श्रीशांत आता नवी इनिंग खेळण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

श्रीशांत बनणार नेता?
क रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी तुरुंगवास भोगलेला क्रिकेटपटू एस. श्रीशांत आता नवी इनिंग खेळण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. ही नवी इनिंग म्हणजे पॉलिटिक्स...होय क्रिकेटपटू श्रीशांत भविष्यात नेतेगिरी करताना दिसण्याची शक्यता आहे. आगामी केरळ विधानसभा निवडणुकीत श्रीशांत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची खबर आहे. केरळच्याच भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने श्रीशांतला निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. अर्थात श्रीशांतने हा प्रस्ताव स्विकारला की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. उद्या बुधवारी श्रीशांत आपले पत्ते उघड करणार आहे. तेव्हा बघूयात!!