सोनाली बेंद्रेचे ‘पालकत्वावर’ पुस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 07:05 IST2016-03-11T14:05:19+5:302016-03-11T07:05:19+5:30

नुकतेच सोनाली बेंद्रे-बहल यांच्या ‘द मॉडर्न गुरुकुल - माय एक्सपेरिमेंट्स विथ पॅरेंटिंग’ या पुस्तकाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत रंगला. याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सोनाली बेंद्रे यांनी पालकत्वावर लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक पालकासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Sonali Bendre's 'Guardianism' book | सोनाली बेंद्रेचे ‘पालकत्वावर’ पुस्तक

सोनाली बेंद्रेचे ‘पालकत्वावर’ पुस्तक

कतेच सोनाली बेंद्रे-बहल यांच्या ‘द मॉडर्न गुरुकुल - माय एक्सपेरिमेंट्स विथ पॅरेंटिंग’ या पुस्तकाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत रंगला. याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सोनाली बेंद्रे यांनी पालकत्वावर लिहिलेले हे पुस्तक प्रत्येक पालकासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 याप्रसंगी अमृता देवेंद्र फडणवीस, हिंदी चित्रपट दिग्दर्शक गोल्डी बहल, पेंग्विन बुक इंडियाच्या मुख्य संपादक मिली ऐश्वर्या, शायना एन.सी. हेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, सोनाली बेंद्रे यांनी ‘पालकत्व’ या विषयावर एका उत्तम, दर्जेदार पुस्तकाचे लिखाण केले आहे. हे पुस्तक कथेच्या स्वरूपात आणि त्यांच्या स्वानुभवावर आधारित असल्याने त्यांनी जिद्दीने केलेले लिखाण या पुस्तकातून दिसते. त्यामुळे पालक असलेल्या आणि पालक होणाºया अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल.
या पुस्तकात सोनाली बेंद्रे यांचा मुलगा रणवीर याच्या जन्मानंतर त्यांनी सिनेमापासून लांब राहत मातृत्वाला प्राधान्य दिले. मुलाला वाढवत असताना एक पालक आणि एक आई म्हणून आपण काय शिकलो, आपल्याला काय अनुभव आले हे सगळे या पुस्तकात मांडले आहे. आजच्या काळात आई-वडील दोघेही काम करीत असल्याने मुलांना चांगल्या वातावरणात वाढविणे ही अत्यंत आवश्यक बाब बनत आहे, यावरही प्रकाश टाकला आहे.

Web Title: Sonali Bendre's 'Guardianism' book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.