Sonakshi sinha and khushi kapoor wear the same gown | सेम आउटफिट्समध्ये दिसल्या सोनाक्षी सिन्हा आणि खूशी कपूर; तुम्हाला कोणाचा लूक आवडला?
सेम आउटफिट्समध्ये दिसल्या सोनाक्षी सिन्हा आणि खूशी कपूर; तुम्हाला कोणाचा लूक आवडला?

आपण अनेकदा बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी सारखेच आउटफिट्स वेअर केल्याचे पाहतो. अनेकदा यामुळे अभिनेत्री ट्रोल झाल्याचीही अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. सध्या अशीच चर्चा बॉलिवूडमद्ये पुन्हा होत आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खूशी कपूर यादोघीही सारख्याच आउटफिट्समध्ये दिसून आल्या. 

सोनाक्षी सिन्हाने नुकताच रिलिज झालेला चित्रपट खानदानी शफाखानाच्या प्रमोशन दरम्यान हा ड्रेस वेअर केला होता. सोनाक्षी सिन्हाच्या या ड्रेसकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. सोनाक्षी सिन्हाचा सिल्वर कलरचा गाउन चर्चेचा विषय ठरला होता. कारण असाच सेम गाउन खूशी कपूरने मागील वर्षी एका इवेंटसाठी वेअर केला होता. 

गोल्डन बॉडीकॉन गाउन डिजाइनर जारा उमरीगरने डिझाइन केला आहे. सोनाक्षी सिन्हाने जो गाउन वेअर केला होता, तो सिल्वर बीड्सपासून तयार करण्यात आला होता आणि थाई हाय स्लिटसुद्धा होता. याचसोबत न्यूड हिल्समुळे लूक आणखी सुंदर दिसत होता. 

खूशी कपूरने हा गाउन मागील वर्षी उदयपूरमध्ये मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीच्या प्री-वेडिंग प्रोग्रामसाठी वेअर केला होता. सोनाक्षीने या गाउनसोबत कोणतीही ज्वेलरी वेअर केली नव्हती. पण खूशी कपूरने सोन्याच्या बांगड्या, अंगठी आणि डायमंड इयरिंग्स वेअर केल्या होत्या. 


Web Title: Sonakshi sinha and khushi kapoor wear the same gown
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.