सोशल मीडियामुळे सुखी संसाराला तडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 05:44 IST2016-03-13T12:44:02+5:302016-03-13T05:44:02+5:30
फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवरील मेसेजच्या आधारे पती-पत्नी एकमेकांवर बाहेरख्यालीपणाचा संशय घेण्याचे प्रकार वाढत आहेत.

सोशल मीडियामुळे सुखी संसाराला तडे
स पूर्ण जगाला जवळ आणण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग होतो, असे त्याचे समर्थक आणि कंपन्या म्हणतात. मात्र, अलिकडे फेसबुक, व्हॉट्सअॅपमुळे लोक जवळ येण्याऐवजी दुरावताना दिसत आहेत. लुधियाना पोलिसांनी केलेल्या वक्तव्यामुळे याबाबतील नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
त्यांच्या मते, फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवरील मेसेजच्या आधारे पती-पत्नी एकमेकांवर बाहेरख्यालीपणाचा संशय घेण्याचे प्रकार वाढत आहेत. अमेरिकन अॅकॅडमी आॅफ मॅट्रिमॉनियल लायर्सने केलेल्या अध्ययनानुसार सोशल नेटवर्किंग साईट्समुळे घटस्फोट होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
दिल्लीमध्ये स्थित एका सायबर डिटेक्टिव्ह एजन्सीचे कर्मचारी आशुतोष सिंग सांगतात की, माझ्याकडे दिवसातून किमान एक तरी केस अशी येते की, फेसबुक अपडेटमुळे जोडीदाराविषयी शंका मनात घर केलेली असते.
![Facebook Couple]()
घटस्फोट आणि कौटुंबिक वकील प्राची सिंगच्या मते, आपण क्षणाक्षणाची अपडेट फेसबुकवर टाकतो. त्यामुळे एकमेकांवर नजर ठेवण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येतो.
व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर केलेल्या चॅटचा स्नॅपशॉट कोर्टात पुरावा म्हणूनदेखील करण्यात येतो. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.