नितळ, निरोगी व मुलायम त्वचेसाठी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 23:41 IST2016-06-14T18:11:12+5:302016-06-14T23:41:12+5:30
जसे वय वाढते तसे आपल्या त्वचेवर सुरकूत्या दिसू लागतात आणि वृद्ध होत असल्याची चिन्ह आपणास जाणवतात.

नितळ, निरोगी व मुलायम त्वचेसाठी...
वाढत्या वयाबरोबर त्वचेचे विकार वाढण्याची शक्यता जास्त असते. मात्र वेळेवरच काळजी घेतल्यास निरोगी व नितळ त्वचा दिर्घ काळापर्यंत जोपासली जाऊ शकते. आपले आरोग्य निरोगी असेल तर आपली त्वचादेखील तकाकीयुक्त, नितळ व मुलायम राहते. आपल्या शरीराचे संरक्षण करण्यात त्वचेची भूमिक ा अत्यंत महत्त्वाची आहे. वातावरणातील बदलांचा परिणाम हा सर्वप्रथम त्वचेवरच होतो. तारुण्यातील तारुण्यपिटीका, म्हातारपणातील सुरकुत्या आणि राग आल्यास लाल रंग धारण करणे हे त्वचेचे गुणधर्म आहेत.
त्वचा विकार होण्याची प्रमुख कारणे-
* सतत फास्ट फूडचे सेवन करणे.
* त्वचेच्या स्वच्छतेबाबत दुर्लक्षित असणे.
* सतत धूळ, माती व प्रदूषणाच्या संपर्कात राहणे.
* त्वचेचे विकार झालेल्यांच्या संपर्कात राहणे.
* आंघोळ किंवा घाम आल्यावर त्वचेची काळजी न घेणे म्हणजेच व्यवस्थित कोरडी न करणे.
* केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा त्वचेवर अती वापर करणे.
त्वचा विकार झाल्याची काही लक्षणे
* त्वचा नेहमी खाज येणे व कोरडी पडणे किंवा कोंड्याची निर्माण होणे
* तारुण्यपिटीका व पुरळ येणे
* त्वचेचा काहीभाग लालसर होणे तसेच दाह होणे
* त्वचेचे मूळ रंग बदलणे
* त्वचेला दुर्गंध येणे.
त्वचेची काळजी कशी घ्याल?
* आंघोळीनंतर किंवा घाम आल्यानंतर त्वचा ओलसर असल्यास त्वचा काळजीपूर्वक कोरडी करणे तसेच जास्त घाम येणाºया ठिकाणी पावडर वापरणे.
* त्वचेवर नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणे
* त्वचा नितळ व निरोगी राहण्यासाठी आहारदेखील महत्त्वाचा असून त्यात गाईचे तूप, बदाम, खजूर आदी सारख्या सुका मेवांचा समावेश असावा.
* त्वचेची विशेषत: कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दुधावरची साय चांगले मॉयश्चरायझरचा वापर करावा.
* त्वचेचा ओलावा टिकाविण्यासाठी पाणी भरपूर प्यावे तसेच आॅलिव्ह आॅइल किंवा तेलाचा वापर करावा.
* त्वचेला कांती मिळविण्यासाठी किंवा उजळ रंग प्राप्त होण्यासाठी त्वचेवर ब्लिचचा वापर शक्यतो टाळावा.
* ग्रामीण भागातील मुलांच्या त्वचेवर मोठ्या आकारातील पुरळ येत असतात. यालाच बँड असे म्हणतात. हा एक त्वचेचा विकार असून त्वचेची अस्वच्छता हेच त्याचे मुख्य कारण आहे.
* केमिकल्सयुक्त साबणाऐवजी नैसर्गित घटक असलेल्या आयुर्वेदिक उटण्याचा वापर करावा.
तयार करा घरगुती आयुर्वेदिक उटणे
डाळीचे पीठ + संतरा साल + आवळा पावडर + अनंता + नागरमोथा + वाळा + चंदन पावडर हे सर्व घटक एकत्र वाटून घेऊन भरणीत भरून ठेवावे आणि आंघोळीसाठी याचाच वापर करावा. हे उटणे आंघोळीसाठी वापरल्याने त्वचेचे आरोग्य निरोगी राहुन नितळ व मुलायम होते.