टेलर-विन्फ्रेच्या वादावर पडदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 16:19 IST2016-03-22T23:19:18+5:302016-03-22T16:19:18+5:30
हॉलीवुड अभिनेता टेलर पेरीने ओपरा विन्फ्रेसोबतच्या वादावर पहिल्यांदाच वक्तव्य केले असून, या वादाबाबतच्या बातम्या चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

टेलर-विन्फ्रेच्या वादावर पडदा
ह लीवुड अभिनेता टेलर पेरीने ओपरा विन्फ्रेसोबतच्या वादावर पहिल्यांदाच वक्तव्य केले असून, या वादाबाबतच्या बातम्या चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पेरीने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून माझ्या आणि ओपरामध्ये वाद झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. मात्र या बातम्या आमच्या दोघांमध्ये फुट पाडण्यासाठीच पसरविल्या जात असल्याचा माझा ठाम विश्वास असल्याचे त्याने सांगितले. यावेळी पेरीने ट्विटरवर एक ग्रुप फोटो शेअर केला असून, त्यात विन्फ्रे सुद्धा दिसत आहे.