सत्या नाडेला प्रेक्षकाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:24 IST2016-01-16T01:17:44+5:302016-02-06T13:24:27+5:30
सत्या नाडेलाची वादग्रस्त विधानानंतर माघार...

सत्या नाडेला प्रेक्षकाच्या भूमिकेत
ए ा वादग्रस्त प्रतिक्रियेनंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी आता माघार घेतली आहे. ग्रेस होपर सेलिब्रेशन आॅफ वूमन इन कॉम्प्युटिंग असा हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमादरम्यान नाडेला यांनी वादग्रस्त कॉमेंट करून वाद ओढवून घेतला होता. मात्र, त्यानंतर आपल्याला खूप दु:ख झाले होते असे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या प्रगतीमध्ये काय अडचणी वाटतात, असे एकदा त्यांना विचारण्यात आले होते. तेव्हा ''व्यवस्थाच आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाते. आपण आपल्या नशिबावर विश्वास ठेवून चालायला हवे. आपण चांगले काम केले असेल, तर नक्कीच प्रगती करू शकता. नाहीतर आपण शिखरावरून खाली पडू शकता,' असे नाडेला म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी ही बाब नाकारली होती. म्हणूनच आता ते १२ हजार प्रेक्षकांमध्ये बसून फक्त ऐकणार आहेत.