शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईमध्ये ट्राय करा सारा अली खानचे 'हे' हटके लूक्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 17:59 IST

सध्या वर्षातील शेवटचा महिना सुरू आहे. सणांचा सीझन संपला असला तरिही लग्नसराईला सुरूवात झाली आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रेडिशनल आणि एथनिक लूक करण्याची अजूनही संधी आहे.

सध्या वर्षातील शेवटचा महिना सुरू आहे. सणांचा सीझन संपला असला तरिही लग्नसराईला सुरूवात झाली आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रेडिशनल आणि एथनिक लूक करण्याची अजूनही संधी आहे. अशातच बेस्ट फ्रेंडचं लग्न किंवा नातेवाईकांच्या लग्नामध्ये तुम्ही थोडा वेगळा आणि हटके लूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही बेस्ट ऑप्शन्स सांगणार आहोत. तुम्हीही एथनिक किंवा ट्रेडिशनल ड्रेसमध्ये हटके लूक करण्याच्या विचारात असाल तर आपल्या आगामी चित्रपटांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या सारा अली खानकडून ड्रेसिंग टिप्स घेऊ शकता. 

साराचा केदारनाथ हा चित्रपट रिलिज झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या सारा आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. टीव्हीवरील जवळपास सर्वच चॅनल्सवरील रियॅलिटी शोमध्ये सारा दिसून येत आहे. मागील काही दिवसांत आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसमध्ये दिसून आली होती. यावेळी सारा नचिकेत बर्वेने डिझाईन केलेल्या मरून कलरच्या ड्रेसमध्ये दिसून आली. साराने मरून कलरचा लॉन्ग स्कर्टला पिंक कलरच्या फ्लोरल एम्ब्रॉयडरी असणारा क्रॉप टॉप आणि मॅचिंग लॉन्ग जॅकेटसोबत वेअर केलं होतं. साराचा हा लूक संगीत फंक्शनसाठी एकदम परफेक्ट आहे. 

लाइम ग्रीन कलरचा शरारा आणि कुर्ती सेट सुकृती आणि आकृती यांनी डिझाइन केला होता. जो लग्नातील मेहंदीच्या फंक्शनसाठी बेस्ट लूक आहे. शरारासोबत साराने परिधान केलेल्या कुर्त्यावर सुंदर फ्लोरल एम्ब्रॉयडरी केली आहे. त्याचबरोबर मॅचिग कलरचा दुपट्टा वेअर केला असून त्यावर गोल्डन डॉट्स आहेत. सारा या लूकमध्ये फार क्युट दिसत आहे. 

एमटीव्हीचा रियॅलिटी शो एस ऑफ स्पेसमध्ये सारा केदारनाथच्या प्रमोशनसाठी गेली होती. यादरम्यान साराने नेवी ब्लू कलरचा प्लाझो वेअर केला होता. ज्यावर व्हाइट कलरचे स्क्वेअर्स तयार करण्यात आले होते आणि मॅचिंग क्रॉप टॉप ज्यावर फ्लोरल वर्क केला होता. या इंडो वेस्टर्न लूकमध्ये ती फार गोड दिसत होती. 

टीव्हीवरील रियॅलिटी शो 'सारे गा मा पा'च्या सेटवर केदारनाथच्या प्रमोशनसाठी पोहोचलेली सारा अली खान रेड कलरचा शरारा आणि कुर्त्यामध्ये दिसून आली. रॉ मॅन्गोद्वारे डिझाइन करण्यात आलेला रेड ब्रोकेड शरारा लग्नाआधी होणाऱ्या संगीत किंवा मेहंदीसाठी परफेक्ट आहे. 

सिल्वर आणि ग्रे कलरचा हा लेहेंगा ज्यावर ब्ल्यू कलरने फ्लोरल वर्क करण्यात आले आहे. प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसलाने डिझाइन केलेला आहे. साराचा हा लेहेंगा फार सुंदर असून सारा यामध्ये सुंदर दिसत आहे. हा लेहेंगा नातेवाईकांच्या लग्नामध्ये किंवा मैत्रिणीच्या लग्नामध्ये वेअर करण्यासाठी परफेक्ट आहे. 

टॅग्स :Sara Ali Khanसारा अली खानbollywoodबॉलिवूडfashionफॅशन