बॉलिवूडसेलिब्रिटींचे महागडे आउटफिट्स, शूज, एक्ससरिज यांच्या चर्चा नेहमीच होत असतात. सर्व सामान्यांच्या वजेटच्या बाहेर असणारे सेलिब्रिटींचे आउटफिट्सच्या किमती ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. पण आज आम्ही तुम्हाला सारा अली खानच्या एका जिम टॉपबाबत सांगणार आहोत. ज्याची किंमत एकदम बजेटमध्ये आहे. 

जेव्हा बॉलिवूडची फॅशनिस्ता असं म्हटलं जातं त्यावेळी त्यामध्ये करिना, सोनम, दीपिका आणि आलिया यांसारख्या टॉप अभिनेत्रींसोबतच स्टार किड्समध्ये चर्चेत असणाऱ्या सारा अली खानचीही चर्चा असते. वेस्टर्न ड्रेस व्यतिरिक्त ट्रेडिशनल ड्रेसही ट्रेन्डी पद्धतीने सारा कॅरी करताना दिसते. तसेच सारा फिटनेस कॉन्शिअसही असून ती नेहमी जिम आउटफिट्समध्येही दिसून येते. 

काहि दिवसांपूर्वी सारा जिम आउटफिट्मध्ये दिसून आली. त्यावेळी तिने येल्लो कलरचा क्रॉप टॉप आणि ब्लॅक कलरच्या वर्कआउट लेगिंग्समध्ये दिसून आली. त्यासोबत तिने मिकी माउसची ट्रान्सपरंट बॅग आणि ब्लॅक कलरच्या स्नीकर्ससोबत टिमअप करून वेअर केलं होतं. 

तुम्हाला या टॉपची किंमत माहीत आहे का? किंमत ऐकून तुम्ही खरचं हैराण व्हाल. येल्लो कलरचा USPS प्रायॉरिटी बॉक्सी क्रॉप टॉपची किंमत फक्त 17.9 डॉलर म्हणजे 1284 रूपये आहे.

त्यामुळे अगदी बजेटमध्ये असणारा हा टॉप तुम्हीही खरेदी करू शकता. हा क्रॉप टॉप साराप्रमाणेच तुम्हालाही कूल लूक देण्यासाठी मदत करेल. 


Web Title: Sara ali khan gym crop top is affordable price is just 1300 rupees
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.