समाजिकतेचे भाग जपणारे ‘रोटरॅक्ट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 05:04 IST2016-03-12T12:04:34+5:302016-03-12T05:04:34+5:30
रोटरॅक्टचे सदस्य एकत्र येऊन एखादा विधायक उपक्रम सुरू करतात यातून समाजातील वंचित घटकांना मदत केली जाते.

समाजिकतेचे भाग जपणारे ‘रोटरॅक्ट’
उद्योगधंद्यांत प्रसिद्धी मिळविलेल्या व्यक्तींनी आपल्या व्यवसायासोबतच समाजाची सेवा करावी व अशी सेवा करणाºयांना प्रोत्साहन द्यावे, या विधायक उद्देशाने स्थापन करण्यात आलेली संस्था म्हणून रोटरी क्लबचा उल्लेख केला जातो. ‘भूतदया, मानवतावादी व शैक्षणिक प्रकल्प यांच्या माध्यमातून विविध राष्ट्रांतील नागरिकांमध्ये सामंजस्य व मैत्री यांची जोपासना वृद्धिंगत व्हावी, हा रोटरी संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
जगातील सर्वांत मोठया संस्थांमध्ये रोटरीचा समावेश होतो. याच प्रमाणे धर्मातीत व राजकारणातीत अशा या आंतरराष्ट्रीय रोटरीने जगातील सर्व रोटरी क्लब व इंटरॅक्ट यांच्या सहकार्याने 18 ते 28 वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी ‘रोटरॅक्ट’ (रोटरी इन अॅक्शन) ही एक नवी संस्था निर्माण केली. यामाध्यमातून युवकांमध्ये समाजिक जाणीव तयार व्हावी हा प्रयत्न केला जातो. रोटरॅक्टचे सदस्य एकत्र येऊन एखादा विधायक उपक्रम सुरू करतात यातून समाजातील वंचित घटकांना मदत केली जाते.
राज्यातील विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे रोटरॅक्ट क्लब तयार करण्यात आले आहेत. या क्लबच्या माध्यमातून अनेक विधायक कामे सुरू आहेत हे विशेष. रोटरी क्लब ज्या सामाजिक भावनेने काम करते त्याच भावना युवकांत निर्माण व्हावी यासाठी ‘रोटरॅक्ट’ची स्थापना करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाºयांनी दिली. युवकांचा समावेश असलेली सर्वांत मोठी संस्था म्हणून रोटरॅक्टची ख्याती जगात पसरली आहे.
यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ‘रोट्रॉक्ट क्लब’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आधार देण्याचे काम सुरू आहे. या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटरचे ज्ञान, इंग्रजीचे धडे व स्वच्छतेबाबतची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी देखील रोटरॅक्ट प्रयत्न करीत आहे. आदिवासी भागात ‘रोटरॅक्ट’चे काम प्रसंशनीय ठरले आहे. रोटरॅक्टच्या या विधायक कामांची ओळख करून देण्याचा हा एक प्रयत्न...