शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

​‘ROSE DAY SPECIAL' : प्रेमात गुलाबाचे महत्त्व वेगळेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 11:38 IST

जगभरात ७ फे ब्रुवारीला ‘रोज डे’ साजरा केला जातो आणि याच दिवसापासून व्हॅलेंटाइन डेचा आठवडा सुरु होतो. असे तर आपण आपल्या पार्टनरला प्रत्येकवेळी ‘गुलाबपुष्प’ देऊन शुभेच्छा देतो मात्र यावेळी आपण वेगळ्या पद्धतीने ‘रोज डे’ साजरा करुया.

-Ravindra Moreशेवटी तो दिवस आलाच ज्या दिवसाची सर्व तरुणाईच्या ह्रदयांना ओढ असते. हो व्हॅलेंटाइन डेचा काउंटडाउन सुरू झाले आहे. प्रत्येक वर्षी जगभरात ७ फे ब्रुवारीला ‘रोज डे’ साजरा केला जातो आणि याच दिवसापासून व्हॅलेंटाइन डेचा आठवडा सुरु होतो. असे तर आपण आपल्या पार्टनरला प्रत्येकवेळी ‘गुलाबपुष्प’ देऊन शुभेच्छा देतो मात्र यावेळी आपण वेगळ्या पद्धतीने ‘रोज डे’ साजरा करुया. योग्य गुलाबाची निवड कराया दिवशी लाखो लोक  आपल्या पार्टनरला गुलाब देतात. काही लोक आपले नाते कायम राहावे म्हणून, काही लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी तर काही लोक आपल्या पार्टनरला मनविण्यासाठी गुलाब देतात. मात्र आपणास माहित असेल की प्रत्येक गुलाबाचे एक वेगळे महत्त्व आहे.   रंगानुसार गुलाबाचे आहे महत्त्व* लाल गुलाबलाल गुलाब प्रेमाचे प्रतिक आहे आणि हे गुलाब एक दुसºयाला देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. फक्त एक गुलाब देऊन आयुष्यात साथ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिले जाते तर लाल गुलाबांचा गुच्छा आपले खरे प्रेम दर्शविण्यासाठी लोक एकमेकांना देतात. * पिवळे गुलाबपिवळे गुलाब मैत्रीचे प्रतिक आहे आणि लोक आपल्या मैत्रीच्या सुरुवातीस एकमेकांना पिवळे गुलाब देतात.* पांढरे गुलाबपांढरे गुलाब शांती आणि स्वच्छतेचे प्रतिक आहे. लोक  आपल्या चुकांची माफी मागण्यासाठी एकमेकांना पांढरे गुलाब देतात. * गुलाबी गुलाबगुलाबी रंगाचे गुलाब उत्साहाचे प्रतिक आहे. आपले प्रिय व्यक्ति नेहमी आनंदी राहण्यासाठी गुलाबी गुलाब दिले जाते.* गडद गुलाबी गुलाबगडद गुलाबी रंगाचे गुलाब आनंद आणि प्रशंसाचे प्रतिक असते आणि याला आपल्या आवडत्या व्यक्तिची प्रशंसा करण्यासाठी दिले जाते. * पर्पल गुलाबपर्पल रंगाचे गुलाब पहिल्या नजरेचे प्रेम दर्शविते आणि हे व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या पे्रमीला प्रपोज करण्यासाठी दिले जाते. ‘रोज डे’च्या काही खास टिप्स* प्रियकराला गुलाब देऊन करा दिवसाची सुरुवात* आपल्या पार्टनरची आवड-निवड जाणा* गुलाबांची बुके स्वत: सजवा* गुलाबाबरोबरच ‘रोज डे’बाबत मॅसेज द्यायला विसरु नका* सरप्राइज बुके घर पोहचवा