रिकी गेरविस विकतोय बंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 12:12 IST2016-01-16T01:19:16+5:302016-02-09T12:12:52+5:30

तुम्हाला लंडनमध्ये एकदम पॉश एरियामध्ये घर हवे असेल एक बंगला विक्रीला काढला आहे.

Ricky Gervis Victooy Bungalow | रिकी गेरविस विकतोय बंगला

रिकी गेरविस विकतोय बंगला

ला एक घर आणि गाडी असावी असे सर्वांचे स्वप्न असते. परंतु तुम्ही जरा मोठे स्वप्न पाहणार्‍यांपैकी असाल तर तुमच्यासाठी एक खूश खबर आहे.

तुम्हाला लंडनमध्ये एकदम पॉश एरियामध्ये घर हवे असेल एक बंगला विक्रीला काढला आहे. प्रसिद्ध कॉमेडियन रिकी गेरविसने लंडनच्या झूपला येथील आलिशान बंगला विकायला काढला आहे. ही कलाकार मंडळी त्यांच्या ग्रेट टेस्टसाठी ओळखली जातात. रिकसुद्धा याला अपवाद नाही.

उत्तर लंडनमधील व्हिक्टोरियन स्टाईलच्या घरात राहण्याची प्रत्येकाची इच्छा होईल. चार मजली या बंगल्यामध्ये तुम्ही म्हणाल त्या सुविधा आहेत. चार आलिशान बेडरूमसह दोन रिसेप्शन रूम, ब्रेकफास्ट रूम, तळघरातमध्ये लेटेस्ट मशीनयुक्त जिम, गोल्फ ड्राईव्ह आणि ओझोन स्विमिंग पूल असा सगळा राजेशाही थाट आहे. बाथरूम तर इतके मोठे आणि सुंदर की दिवसभर इथेच बसून राहावेसे वाटते.

Web Title: Ricky Gervis Victooy Bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.