राजीव-सोनियांचे लग्न सर्वांत चर्चित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:37 IST2016-01-16T01:18:37+5:302016-02-07T11:37:58+5:30

भारतीय संस्कृतीत विवाह या संस्काराला अनन्य साधारण महत्त्व आहे. 

Rajiv-Sonia's marriage is the most popular! | राजीव-सोनियांचे लग्न सर्वांत चर्चित!

राजीव-सोनियांचे लग्न सर्वांत चर्चित!

रतीय संस्कृतीत विवाह या संस्काराला अनन्य साधारण महत्त्व आहे. लग्न हे एखाद्या फेमस व्यक्तीचे असेल तर मग विचारूच नका. त्या लग्नाची चर्चा कितीतरी वर्ष सुरूच असते. राजीव आणि सोनिया गांधी यांच्या लग्नाबाबतही असेच घडले. गांधी परिवाराभोवती असलेले प्रसिद्धीचे वलय पाहता हे लग्न साहजिकच देशातील सर्वांत चर्चेचा विषय ठरले.भारतीय इतिहासात गाजलेल्या या लग्नाचे दुर्मिळ फुटेज ब्रिटिश मूवीटोनने अलीकडेच रिलीज केले. या व्हिडिओत नवी दिल्लीतील १, सफदरगंज रोड या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी सुरू असलेली गडबड दिसून येते. इंदिरा गांधींसह संजय गांधी, विजयालक्ष्मी पंडित, सोनिया यांचे वडील वगळता उपस्थित सर्व कुटुंबीयांच्या चेहर्‍यावरील आनंद लक्ष वेधून घेतो. बंद गळ्याच्या जॅकेटमुळे राजीव यांच्या राजबिंड्या व्यक्तिमत्त्वात आणखी भर पडलेली दिसते. सोनिया यांनी शांत आणि सोबर साडी परिधान केली होती. गांधी कुटुंब भारतीय राजकार णात असल्याने भरपूर लोक त्यांच्यावर प्रेमही करतात आणि टीका देखील करतात. मात्र, या लग्नाच्या विषयावर चर्चा करताना केवळ आणि केवळ उत्सुकता लोकांच्या मनामध्ये दिसून यायची.

Web Title: Rajiv-Sonia's marriage is the most popular!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.