PROMISE DAY SPECIAL: कसमें वादे निभायेंगे हम !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 10:25 IST2017-02-11T04:55:44+5:302017-02-11T10:25:44+5:30
प्रेमात सर्वचजण प्रॉमिस करतात मात्र बऱ्याचदा आपण केलेले प्रॉमिस विसरुन जातात. तर चला मग आज प्रॉमिस डे निमित्त असे प्रॉमिस करा, ज्यामुळे तुमचा पार्टनर आनंदी होईल आणि तुम्हालाही हे प्रॉमिस निभवायला अडचणी येणार नाहीत.
.jpg)
PROMISE DAY SPECIAL: कसमें वादे निभायेंगे हम !
प्रेमात सर्वचजण प्रॉमिस करतात मात्र बऱ्याचदा आपण केलेले प्रॉमिस विसरुन जातात. तर चला मग आज प्रॉमिस डे निमित्त असे प्रॉमिस करा, ज्यामुळे तुमचा पार्टनर आनंदी होईल आणि तुम्हालाही हे प्रॉमिस निभवायला अडचणी येणार नाहीत.
* सोबत राहण्याचे द्या वचन
आतापर्यंत आपल्या पार्टनरसोबत आपण खूपच प्रॉमिस केलेले असतील मात्र जर आपला पार्टनरच्या रुपात आपल्याला जीवनसाथी मिळालाय असे आपणास वाटत असेल तर पार्टनरला आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन द्या. वचन देणे आणि निभविण्यामध्ये खूपच फरक असतो मात्र आपण हे नाते निभविण्याचा मनापासून प्रयत्न करा.
* वेळेवर पोहचण्याचे द्या वचन
विशेषत: आपल्या पार्टनरला भेटायला जायायचे असेल आणि आपण जर वेळेचे पालन करीत नसाल तर ते योग्य नाही. आज आपल्या पार्टनरला वचन द्या की, तुम्ही कधीच त्यांना वाट पाहावयास लावणार नाही. याउलट तुम्ही वेळेच्या आधी पोहचून त्यांची वाट पाहा.
* पार्टनरला जास्त वेळ द्या
सध्या धावपळीच्या युगात आपल्या पार्टनरला पुरेसा वेळ देता येत नसेल तर आज आपल्या पार्टनरला प्रॉमिस करा की तुम्ही त्यांना पुरसा वेळ द्याल.
* खरे बोलण्याचे द्या वचन
सध्या लोकांना खोटे बोलण्याची खूपच सवय आहे. जर आपणासही आपल्या पार्टनरसोबत खोटे बोलण्याची सवय असेल तर ही सवय पुर्णपणे बदला आणि वचन द्या की तुम्ही त्यांच्याशी कोणत्याही परिस्थितीत खोटे बोलणार नाहीत.
* धोका कधीही देणार नाहीत असे द्या वचन
सध्याच्या ट्रेंडमध्ये कोणत्यानकोणत्या कारणाने आपल्या पार्टनरला आपण सहज धोका देत असतो. आज आपल्या पार्टनरला वचन द्या की तुम्ही त्यांना कधीही धोका देणार नाहीत. तसा त्यांना विश्वास द्या.
* भावनिक सपोर्ट द्या
सध्याच्या युगात लोकांना भावनिक सपोर्टची खूपच गरज भासते. नेमकी हिच गोष्ट आपण विसरतो. आज त्यांना भावनिक सपोेर्ट देण्याचे वचन दया.
* दुसरीकडे अट्रॅक्ट होणार नाहीत
कधीकधी आपल्या पार्टनरकडून आपल्याला बोरिंग फिल होते किंवा त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याची जाणिव होऊ लागते अशावेळी आपण दुसरीकडे अट्रॅक्ट होतो. मात्र असे न करता आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहण्याचे आज वचन दया.
Also Read : प्रेमात गुलाबाचे महत्त्व वेगळेच!