प्रियांकाच्या या बेल्टच्या किमतीत तुम्ही दुबई ट्रिप प्लॅन करू शकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 16:27 IST2019-05-28T16:14:56+5:302019-05-28T16:27:05+5:30
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आपला अभिनय आणि फॅशन सेन्ससाठी हॉलिवूडमध्येही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी पार पडलेला मेटा गाला 2019मधील प्रियांकाचा लूक चर्चेचा विषय ठरला होता.

प्रियांकाच्या या बेल्टच्या किमतीत तुम्ही दुबई ट्रिप प्लॅन करू शकता
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आपला अभिनय आणि फॅशन सेन्ससाठी हॉलिवूडमध्येही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी पार पडलेला मेटा गाला 2019मधील प्रियांकाचा लूक चर्चेचा विषय ठरला होता. प्रियांकाच्या या विचित्र लूकला नेटकऱ्यांनी निशाण्यावरचं ठेवले होते. पण त्यानंतर काही दिवसांतच पार पडलेल्या कान्समध्ये प्रियांकाच्या सर्व लूक्सनी चाहत्यांना पूरतं घायाळ केलं होतं. तसं पाहायला गेलं तर प्रियांका आपल्या आभिनयासोबतच स्टाइल आणि फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
अनेकदा ती आपल्या स्टायलिश अंदाजासोबत कपडे आणि एक्ससरीजसाठीही ओळखली जाते. कदाचित यामुळेच ती जेव्हाही दिसते त्यावेळी तिच्या आउटफिट्सपासून तिच्या एक्ससरीजही चर्चेच्या विषय ठरतात. यावेळीही ती जेव्हा डार्क पिंक कलरच्या लूकमध्ये दिसली त्यावेळी तिच्या सुंदर लूकपेक्षाही जास्त चर्चा तिच्या बेल्टच्या होऊ लागल्या.
प्रियांकाने आपल्या ड्रेससोबत जो बेल्ट मॅच केला होता, त्याची किंमत ऐकून तुम्ही खरचं हैराण व्हाल. कारण या फक्त बेल्टच्या किंमतीमध्ये एखादी व्यक्ती संपूर्ण दुबईची ट्रिप प्लॅन करू शकतो.
मिसेस जोनस आपल्या अॅनिवर्सरी निमित्ताने प्रसिद्ध हॉलिवूड सिंगर मराया कॅरीचा शो अटेंन्ड करायला पोहोचली होती. त्यादरम्यान तिने डार्क पिंक कलरचा पॅन्ट-सूट वेअर केला असून च्यासोबत मॅचिंग टॉपही वेअर केला होता.
आपल्या या लूकसोबत तिने शनॅलचा सिल्वर आणि पिंक कॉम्बिनेशन असलेला बेल्ट वेअर केला होता. या बेल्टची किंमत 980 डॉलर म्हणजेच, भारतीय चलनामध्ये जवळपास 68 हजार रूपये इतकी होती.
प्रियांकाने वेअर केलेला हा बेल्ट ऑफिशिअल वेबसाइटवरही अवेलेबल आहे. जर तुम्हालाही प्रियांकाचा हा स्टायलिश बेल्ट खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्हीही हा बेल्ट खरेदी करू शकता. पण कदाचित त्यासाठी तुम्हाला तुमच्या दुबई ट्रिपवर पाणी सोडावं लागू शकतं.