प्रियांका चोप्राच्या या ड्रेसची खिल्ली, कचऱ्याच्या बॅगसोबत केली तुलना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 14:44 IST2018-11-06T14:43:56+5:302018-11-06T14:44:55+5:30
प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या लूक आणि आउटफिटमध्ये सतत एक्सपरिमेंट करताना दिसते. पण तिचे हे एक्सपरिमेंट लोकांना कमीच पसंत पडलेले दिसतात.

प्रियांका चोप्राच्या या ड्रेसची खिल्ली, कचऱ्याच्या बॅगसोबत केली तुलना!
प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या लूक आणि आउटफिटमध्ये सतत एक्सपरिमेंट करताना दिसते. पण तिचे हे एक्सपरिमेंट लोकांना कमीच पसंत पडलेले दिसतात. त्यामुळेच ती तिच्या वेगवेगळ्या ड्रेसेसमुळे सोशल मीडियात चर्चेत असते. एका इव्हेंटमध्ये तिच्या गाउनला काही लोकांनी पडदा म्हटले होते. आता तिच्या एका जॅकेटची तुलना लोकांनी कचऱ्याच्या बॅगसोबत केली आहे.
प्रियंका चोप्रा सध्या बॉलिवूडमध्ये कमीच दिसते. कारण सध्या ती हॉलिवूडमध्ये बिझी आहे. इतकेच काय तर तिच्या फॅशनवरही हॉलिवूडचा प्रभाव बघायला मिळत आहे. पण प्रियांकाचे हे एक्सपरिमेंट तिला चांगलेच भारी पडताना दिसतात. यावेळी प्रियांका काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसली. हा तिचा लूक काही लोकांना तर पसंत आला पण काहींनी तिची खिल्ली उडवली. तिच्या या जॅकेटची तुलना काहींनी कचऱ्याच्या बॅगसोबत केली आहे.
या ड्रेससोबत प्रियांकाने कॅट आय गॉगल लावला आहे आणि कानात लांब ईअररिंग घातले आहेत. तसा प्रियांका याच्याशी काही देणंघेणं नाही की, तिच्या लूकवर कोण काय म्हणतं. ती नेहमी तिला हवे तसे कपडे परिधान करते. सध्या ती तिच्या लग्नाच्या तयारीतही बिझी आहे.