‘पॉन स्टार’ चमलीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 04:54 IST2016-03-11T11:54:04+5:302016-03-11T04:54:04+5:30

‘पॉन स्टार’ आॅस्टिन ली रसेलला लास वेगास पोलिसांनी अटक केली आहे.

'Pon Star' is arrested | ‘पॉन स्टार’ चमलीला अटक

‘पॉन स्टार’ चमलीला अटक

व्ही प्रेक्षकांचा फेव्हरेट ‘पॉन स्टार’ आॅस्टिन ली रसेल, ज्याला आपण सर्वजण चमली नावाने ओळखतो, त्याला लास वेगास पोलिसांनी अटक केली आहे.

अवैैधरीत्या बंदूक आणि ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली.

लैैंगिक हिंसाचाराच्या तक्रारीसंदर्भात पोलिसांनी जेव्हा आॅस्टिनच्या साऊथवेस्ट लास वेगास येथील घरी धाड टाकली तेव्हा त्यांना मेथाफेतमाईन, मारियुआन आणि एक पिस्तुल सापडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर लैैंगिक हिंसेचा गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. एका महिलेने आॅस्टिनविरुद्ध लैैंगिक हिंसाचार केल्याचा आरोप केला आहे.

६२ हजार डॉलर्सच्या जामीनावर त्याची सुटका झाली आहे. भोळा आणि निरागस वाटणाºया ‘चमली’च्या अशा वर्तनामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.

Web Title: 'Pon Star' is arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.