कबाडात मिळाले 1 लाख डॉलरचे चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 08:04 IST2016-03-10T15:04:15+5:302016-03-10T08:04:15+5:30
दुर्मीळ चित्र असल्याचे लक्षात आले.
.jpg)
कबाडात मिळाले 1 लाख डॉलरचे चित्र
या महिलेने एक बाहुली व प्लॅस्टिकची गाय आणि इतर वस्तू असलेला एक खोका जुन्या बाजारातून खरेदी केला होता. या खोक्यात असलेल्या चित्राच्या चौकटीवर रेन्वा नावाची पट्टी दिसल्यामुळे तिने स्थानिक लिलावगृहात जाऊन या चित्राची तपासणी करून घेतली.
त्यावेळी व्हर्जिनिया लिलावगृहातील तज्ज्ञांना हे दुर्मीळ चित्र असल्याचे लक्षात आले. या महिन्यात या चित्राचा लिलाव होणार असून, त्यावेळी या चित्राला सुमारे एक लाख डॉलर किंमत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पियरे आॅगुस्ट रेन्वा (1841-1919) हे चित्रकलेच्या ‘इंप्रेशनिस्ट’ या शैलीच्या विकासामधील एक अग्रणी चित्रकार होते.