मॅगझिन कव्हरच्या फोटोशूटसाठी करिना कपूरचा नववधू साज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 15:10 IST2019-08-05T15:08:26+5:302019-08-05T15:10:27+5:30
बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव हे करिना कपूरचं असतं, याबाबत काहीच शंका नाही. करिनाचा रेड कार्पेट लूक असो किंवा एअरपोर्ट लूक, हॉलिडे लूक असो किंवा प्रमोशनल लूक... करिनाचे सर्वच लूक लय भारी दिसतात.

मॅगझिन कव्हरच्या फोटोशूटसाठी करिना कपूरचा नववधू साज
बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव हे करिना कपूरचं असतं, याबाबत काहीच शंका नाही. करिनाचा रेड कार्पेट लूक असो किंवा एअरपोर्ट लूक, हॉलिडे लूक असो किंवा प्रमोशनल लूक... करिनाचे सर्वच लूक लय भारी दिसतात. कोणत्याही लूकमध्ये करिना जणू स्टाईल क्वीनच बनते असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी करिनाने एक ब्रायडल फोटोशूट केलं आहे. त्यामध्येही करिनाच्या अदा घायाळ करणाऱ्याच होत्या. पाहा फोटो...
पिंक कलरचा हॅन्ड क्राफ्टेड सिल्क लेहंगा
करिनाने salmon पिंक कलरचा हॅन्ड क्राफ्टेड सिल्क लेहंगा, हेव्ही वर्क असणारा क्रिस्टल ऑफ शोल्डर ब्लाउज आणि रफ्फल लेस असणारा दुपट्टा कॅरी केला होता. हे सर्व तिने एका हेव्ही चोकर नेकलेससोबत टीमअप केलं होतं.
डिझायनर रिपल आणि हरप्रीतने केलं होतं तयार
करिनाच्या मॅग्जीन कव्हर लूकला प्रसिद्ध डिझायनर जोडी रिपल आणि हरप्रीत यांनी तयार केलं होतं. करिनाचा हा गोल्डन लेहंगाच पाहा... हेव्ही वर्क असणाऱ्या या गोल्डन लेहंग्यामध्ये करिना फार सुंदर दिसत आहे.
ग्रे कलरची नेट असणारी साडी
मॅग्जीन शूटसाठी करिना फक्त लेहंग्यामध्ये नाही तर साडी लूकमध्येही दिसून आली. करिनाने अॅश ग्रे कलरची हेव्ही वर्क असणारी नेट फॅब्रिक साडी परिधान केली होती. तसेत तिने स्पगेटी स्टाइल मॅचिंग वर्क असणारा ब्लाउज आणि व्हाइट कलरचे लॉन्ग इयरिंग्ससोबत टिमअप केलं होतं.
गोल्डन हेव्ही वर्क अनारकली
करिनाने या फोटोशूटसाठी गोल्डन बेस असणारा फुल स्लीव्स मल्टीकलर अनारकली वेअर केला होता. या हेव्ही ड्रेससोबत जास्त एक्ससरिजची गरज नव्हती, त्यामुळे करिनाने ब्राइडल लूकसाठी फक्त हातांमध्ये स्पेशल हॅन्ड ज्वेलरी वेअर केली होती. जी तिला परफेक्ट ब्राइडल लूक देण्यासाठी मदत करत होती.
पाहूया करिना कपूर खानच्या ब्राइडल फोटो शूटचे आणखी काही फोटो :