जनुकांमध्ये बदल करण्यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:36 IST2016-02-05T06:06:48+5:302016-02-05T11:36:48+5:30

जनुकांमध्ये बदल करण्यास परवानगी भविष्यातील मानव हे अतिप्रगत असणार यात काही शंका नाही. बाळ पोटात असल्यापासूनच त्याला सर्व रोगापांसून बचाव करण्याची शक्ती आणि 

Permission to change the gene | जनुकांमध्ये बदल करण्यास परवानगी

जनुकांमध्ये बदल करण्यास परवानगी

ुकांमध्ये बदल करण्यास परवानगी

भविष्यातील मानव हे अतिप्रगत असणार यात काही शंका नाही. बाळ पोटात असल्यापासूनच त्याला सर्व रोगापांसून बचाव करण्याची शक्ती आणि क्षमता देण्याचे तंत्रज्ञान विकसित होईल. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून इंग्लंडमध्ये अर्भकाच्या जनुकांमध्ये कृत्रिम बदल करण्याला वैद्यकीय प्रायोगांसाठी परवानगी देऊन एक नवाच पायंडा घातला आहे. चीनमधील वैज्ञानिकांना सर्वप्रथम जुनकांमध्ये कृत्रिम हस्तक्षेप करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमिवर स्टेम सेल वैज्ञानिक कॅथी नायकन यांना अशा पद्धतीचे संशोधन आणि प्रयोग करण्याची मुभा दिली.
द ह्युमन फर्टिलायझेशन अँड एम्ब्रॉयलॉजी आॅथॉरिटी (एचएफईए)ने फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटचा ‘जेनेटिक एडिटिंग’ टेक्निकबद्दलचा प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कॅथी यांनी माहिती दिली की, ‘आम्ही केवळ संशोधनासाठी पहिल्या सात दिवसांमध्ये प्रजननक्षम बीजांडांचा विकास कसा होतो याचा अभ्यास करणार आहोत. एक पेशी पासून 250 पेशींमध्ये विकसित होण्याºया प्रक्रियेचे अध्ययन करण्यात येणार आहे.’ अनेक तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, ‘हा अभूतपूर्व निर्णय आहे.. वैद्यकीय क्षेत्रात यामुळे नवनवीन शोध लागतील.’ ‘सीआरआयएसएपीआर कॅस९’ असे या जनुकांमध्ये कृत्रिम बदल करण्याच्या तंत्रज्ञानाचे नाव आहे.
अनेक मानवधिकार संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. अशा तंत्रज्ञानातून भविष्यात कृत्रिम पद्धतीने अर्भक तयार केले जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ‘ह्युमन जेनेटिक्स अलर्ट’ मोहिमेतून डेव्हिड किंग याविषयी जनजागृती करण आहेत. परंतु वैज्ञानिकांना अशा प्रकारे कृत्रिम अर्भक विकसित करण्याची परवानगी नाही. उलट जन्मजात असणाºया अनेक समस्या, रोग, आजारांपासून बाळाला वाचवण्याचे काम याद्वारे करण्यात येणार असल्याचे संशोधकांनी सांगितले. 

Web Title: Permission to change the gene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.