योगामुळे मन:शांती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 22:07 IST2016-03-23T05:07:49+5:302016-03-22T22:07:49+5:30
पॉप स्टार मिली साइरसला योगामुळे मन:शांती मिळते. २३ वर्षीय मिलीने योगा करतानाचे काही व्हिडीओ बनविले असून, त्यात ती योगा करण्याबाबत लोकांना आवाहन करीत आहे.

योगामुळे मन:शांती
प प स्टार मिली साइरसला योगामुळे मन:शांती मिळते. २३ वर्षीय मिलीने योगा करतानाचे काही व्हिडीओ बनविले असून, त्यात ती योगा करण्याबाबत लोकांना आवाहन करीत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पहिल्या व्हिडीओमध्ये साइरसने ‘योग्य कामातून करा दिवसाची सुरुवात’ असा संदेश दिला आहे. ती त्यात शीर्षासन करताना बघावयास मिळत आहे. तसेच योगामुळे मला मन:शांती मिळत असल्याचेही सांगत आहे.