OMG : ​मित्रांसोबत वेळ घालविण्यासाठी महेंद्र सिंह धोनीने केला १३ वर्षानंतर रेल्वे प्रवास !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 12:11 IST2017-02-24T06:38:41+5:302017-02-24T12:11:18+5:30

धोनीने आपल्या महागड्या कारने जाणे पसंत न करता आपल्या मित्रांसोबत सरळ रेल्वे प्रवास सुरु केला. आणि मित्रांसोबतचा हा रेल्वे प्रवास त्याने एन्जॉयही केला.

OMG: Mahendra Singh Dhoni has taken 13 years to spend time with friends | OMG : ​मित्रांसोबत वेळ घालविण्यासाठी महेंद्र सिंह धोनीने केला १३ वर्षानंतर रेल्वे प्रवास !

OMG : ​मित्रांसोबत वेळ घालविण्यासाठी महेंद्र सिंह धोनीने केला १३ वर्षानंतर रेल्वे प्रवास !

मैदानात आपली कॅप्टनशिप आणि धुवाधार फलंदाजीमुळे विरोधी टीमला गारद करणारे महेंद्र सिंह धोनी असे व्यक्तित्त्व आहे, ज्यांच्या आयुष्यावर एक चित्रपटही बनविण्यात आला आहे. या चित्रपटात त्यांच्या आयुष्यातील काही असे प्रसंग दाखविण्यात आले आहेत, जे धोनी स्वत: कधीही सांगु शकत नाही. 
धोनी जेवढा चांगला फलंदाज आणि कॅप्टन आहे, तेवढाच तो चांगला व्यक्तिदेखील आहे. नुकताच असा एक किस्सा घडला. तो असा, धोनीला अशी माहिती मिळाली की, झारखंड टीममध्ये त्याच्या सोबत खेळलेले त्याचे काही मित्र एका ठिकाणी जात आहेत. विशेष म्हणजे धोनीलाही तिथेच जायायचे होते. मग काय धोनीने आपल्या महागड्या कारने जाणे पसंत न करता आपल्या मित्रांसोबत सरळ रेल्वे प्रवास सुरु केला. आणि मित्रांसोबतचा हा रेल्वे प्रवास त्याने एन्जॉयही केला. विशेष म्हणजे धोनीचा हा रेल्वे प्रवास तब्बल १३ वर्षानंतरचा आहे. 
 

Web Title: OMG: Mahendra Singh Dhoni has taken 13 years to spend time with friends