पर्यावरण जतनासाठी अॅपल वापरतेय नवा फंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 13:34 IST2016-04-15T08:04:43+5:302016-04-15T13:34:43+5:30
‘आयस्टोर’वर उपलब्ध असणाऱ्या काही निवड अॅप्सच्या विक्रीमधून मिळणारी रक्कम अॅपल डब्ल्यूडब्ल्यूएफ या संस्थेला देणार आहे.

पर्यावरण जतनासाठी अॅपल वापरतेय नवा फंडा
न सर्गाची वाढती हानी लक्षात घेता मोठी पाऊले उचलण्याची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड, प्रदूषण यांसारख्या समस्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडण्यासाठी एकत्रित काम करणे अपरिहार्य झाले आहे. हे लक्षात घेऊन अॅपलने पर्यावरण जतनाच्या कार्यात हातभार लावण्यासाठी नवी युक्ती अवलंबली आहे.
‘आयस्टोर’वर उपलब्ध असणाऱ्या काही निवड अॅप्सच्या विक्रीमधून मिळणारी रक्कम अॅपल ‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड’ (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या संस्थेला देणार आहे.
24 एप्रिलपर्यंत ‘अॅप्स आॅफ अर्थ’ कार्यक्रमा अंतगर्त निसर्गरक्षणाचे उपाय आणि पर्यायांबद्दल प्रचार आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी 27 अॅप्सची निर्मिती करण्यात आली आहे.
‘अॅपल’मधील पर्यावरण, धोरण आणि सामाजिक कार्यक्रम विभागाच्या अध्यक्षा लिसा जॅक्सन यांनी माहिती दिली की, गेल्या काही वर्षांपासून आमची कंपनी पर्यावरणाविषयक पाऊले उचलत आहे.
आमची उत्पादने कशा प्रकारे पर्यावरणपुरक असतील, त्यांचे रिसायक्लिंग कसे केले जाऊ शकते याकडे आम्ही लक्ष देतो. आमच्या ग्राहकांमध्येदेखील ही वृत्ती रुजावी या हेतूने आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.