‘न भुतो न भविष्य’ कडक उन्हाळा येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 22:39 IST2016-06-14T17:09:16+5:302016-06-14T22:39:16+5:30

पुढच्या पन्नास वर्षांतच ‘न भुतो न भविष्य’ असा कडक उन्हाळा अधिकांश पृथ्वीवर अवतरणार असल्याची चिंता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

'Neither the future nor the future' will be hot summer | ‘न भुतो न भविष्य’ कडक उन्हाळा येणार

‘न भुतो न भविष्य’ कडक उन्हाळा येणार

न महिनादेखील अर्ध्यावर आला आहे; पण वरुणराजाचे अजुनही आगमन झालेले नाही. मागच्या तीन वर्षांपासून असलेला दुष्काळ पुढेही कायम राहण्याची चिन्हे आहेत. तापमानाने तर सर्व उच्चांक मोडित काढलेले आहेत.

ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास पुढच्या पन्नास वर्षांतच ‘न भुतो न भविष्य’ असा कडक उन्हाळा अधिकांश पृथ्वीवर अवतरणार असल्याची चिंता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

तापमानवृद्धीचा आलेख जर याच वेगाने वाढत राहिला तर पृथ्वीच्या ८० टक्के भागात २०६१ ते २०८० दरम्यान असणारे उन्हाळे मानव इतिहासातील सर्वात उष्ण असतील. अंटार्क्टिका खंडाचा अध्ययनामध्ये सामावेश करण्यात आला नव्हता.

संशोधनाचे प्रमुख आणि अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅटमस्फेरिक रिसर्च’चे वैज्ञानिक फ्लेव्हिओ लेहनर यांनी माहिती दिली की, अतिजास्त तापमान असणारा उन्हाळा नेहमीच कठिण आव्हान असतो.

त्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतील, पीकांचे उत्पादन घटून अधिक गंभीर स्वरूपाचा दूष्काळ येईल. हरितगृह वायूचे उत्सर्जन आपण कमी करू शकलो तर वर उल्लेखलेली शक्यता ४१ टक्क्यांनी कमी होऊ शकते.

Web Title: 'Neither the future nor the future' will be hot summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.