फॅशन वर्ल्डमध्ये 3D डिजाइन रिंग्सचा ट्रेन्ड; तुम्ही पाहिलीत का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 03:06 PM2019-07-09T15:06:21+5:302019-07-09T15:07:07+5:30

फॅशन वर्ल्डमध्ये कधी कोणता ट्रेन्ड पॉप्युलर होईल हे सांगता येत नाही. सध्या असाच एक ट्रेन्ड व्हायरल होत असून अनेकजण फॉलो करतानाही दिसत आहेत. हा ट्रेन्ड कोणत्याही आउटफिट्समध्ये नसून तर रिंगमध्ये दिसून येत आहे.

Nature inspired 3D design rings | फॅशन वर्ल्डमध्ये 3D डिजाइन रिंग्सचा ट्रेन्ड; तुम्ही पाहिलीत का? 

फॅशन वर्ल्डमध्ये 3D डिजाइन रिंग्सचा ट्रेन्ड; तुम्ही पाहिलीत का? 

Next

फॅशन वर्ल्डमध्ये कधी कोणता ट्रेन्ड पॉप्युलर होईल हे सांगता येत नाही. सध्या असाच एक ट्रेन्ड व्हायरल होत असून अनेकजण फॉलो करतानाही दिसत आहेत. हा ट्रेन्ड कोणत्याही आउटफिट्समध्ये नसून तर रिंगमध्ये दिसून येत आहे. या रिंग्स लाकडापासून तयार करण्यात येत आहेत. एवढचं नाहीतर या रिंग्स 3डी आहेत. जर तुम्ही सध्या स्वतःसाठी रिंग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा या ट्रेन्डी रिंग्स नक्की लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की असं आहे तरी काय या रिंग्समध्ये? या ट्रेन्डी रिंग्स नेचरपासून इन्सपायर होऊन तयार करण्यात आलेल्या आहेत. 

लाकडापासून तयार केलेल्या रिंग्स

3D रिंग्स लाकडापासून तयार करण्यात आलेल्या आहेत. तसेच यांमध्ये डिझाइन नेचरपासून इन्सपायर होऊन देण्यात आले आहेत. तुम्हाला यामध्ये अनेक व्हरायटीदेखील आढळून येतील. 

थ्री-डी डिजाइन 

रिंग्समध्ये तुम्हाला अनेक 3D ऑप्शन्सही मिळतील. यामुळए रिंगला नवा लूक मिळत असून त्या दिसायलाही फार सुंदर दिसतात. 

अनेक कलर्समध्ये उपलब्ध आहेत

बाजारात या रिंग्समध्ये अनेक ऑप्शन्स उपलब्ध असून तुम्ही कोणत्याही ड्रेससोबत या सहज मॅच करू शकता. बाजारामध्ये याची किंमत 120 रूपयांपासून 500 रूपयांपर्यंत आहे. तुम्ही ऑनलाईनही या रिंग्स खरेदी करू शकता. या रिंग्समध्ये जंगल, झाडं, बर्फ यांसारख्या अनेक डिझाइन्स तुम्हाला सहज उपलब्ध होतील. रिंग्सची साइज आणि डिझाइन यांनुसार यांच्या किमतीमध्ये फरक आढळून येतो. 

इतरही एक्ससरिज उपलब्ध 

मार्केटमध्ये रिंग्सव्यतिरिक्त इतरही अनेक 3D एक्ससरिज उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने पेन्डट, किचैन यांसारख्या गोष्टींची

पाहूयात आणखी काही डिझाइन्स :

 

Web Title: Nature inspired 3D design rings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.