पुन्हा आई होणार रोशनी नाडर एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांचा नववर्षाचा आनंद द्विगुणित होणार आहे....
पुन्हा आई होणार रोशनी नाडर एचसीएलचे संस्थापक...
/>एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांचा नववर्षाचा आनंद द्विगुणित होणार आहे. त्यांची एकुलती एक मुलगी आणि एचसीएलची सीईओ रोशनी नाडर दुसर्यांदा आई होणार असून लवकरच ती बाळाला जन्म देणार आहे. कंपनी जॉईन केल्यानंतर एका वर्षानंतर २00९ मध्ये रोशनीची वयाच्या केवळ २८ व्या वर्षी 'एचसीएल'ची सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २0१0 साली तिचा शिखर मल्होत्राशी विवाह झाला होता. त्यांचा पहिला मुलगा अरमान आता तीन वर्षाचा आहे. पहिल्या मुलाच्या जन्माच्या काही महिन्यांनंतर रोशनी आपल्या वडिलांना पायउतार करून कंपनीच्या चेयरमनपदी विराजमान होणार अशी अफवा पसरली होती.