Naagin serial and Bollywood fame mouni roy curly hair look viral | मौनी रॉयची कर्ली हेअरस्टाइल आणि क्लासी लूक, तुम्हीही करू शकता ट्राय

मौनी रॉयची कर्ली हेअरस्टाइल आणि क्लासी लूक, तुम्हीही करू शकता ट्राय

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारी मौनी रॉय आपल्या बोल्ड आणि हटके अंदाजासाठी ओळखली जाते. खरं तर मौनीने आपल्या कामाची सुरुवात टीव्ही सिरिअल्समधून केली. त्यानंतर 'गोल्ड' या चित्रपटातून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करत मौनीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मौनी नेहमी आपल्या फॅशन सेन्ससाठी चर्चेत असते. अनेकदा ती आपल्या फॅशनमुळे ट्रोलदेखील झाली आहे. आपल्या आउटफिट्सबाबत चर्चेत असणारी मौनी सध्या आपल्या केसांवर केलेल्या प्रयोगामुळे चर्चेत आहे. पण मौनीचा हा लूक चाहत्यांना फार आवडला आहे. 

मौनी रॉयने लांब केसांपासून काळ्या केसांपर्यंत अनेक वेगवेगळे लूक ट्राय केले आहेत. परंतु, मंगळवारी मौनीचा एक वेगळाच लूक लोकांसमोर आला आहे. मौनीने आपल्या केसांना कर्ली लूक दिला आहे. 

33 वर्षांची मौनी रॉय एअरपोर्टवर व्हाइट क्रॉप-टॉप आणि ब्लॅक प्लाझोमध्ये दिसून आली. याव्यतिरिक्त तिने पायांमध्ये व्हाइट स्नीकर्स आणि काळा चष्मा कॅरी केला होता. मौनीने एक ब्लॅक कलरची बॅगही कॅरी केली होती. 

मौनीच्या या लूकमध्ये खास ठरले ते मात्र तिचे कर्ली केस. मौनीच्या कर्ली हेअर्सनी तिचा लूक आणखी खास करण्यासाठी मदत केली. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी मौनी रॉयने टिव्ही सिरिअल्समध्येही काम केलं आहे. आपल्या 'नागिण' या सिरिअलमधून मौनीने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान तयार केलं आहे. 

Web Title: Naagin serial and Bollywood fame mouni roy curly hair look viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.